American consulting firm Survey : पुन्हा नरेंद्र मोदीच जगात नंबर वन

अप्रुव्हल रेटिंगमध्ये जगभरातील मोठ-मोठ्या नेत्यांना टाकलं मागे

192
American consulting firm Survey : पुन्हा नरेंद्र मोदी जगात नंबर वन
American consulting firm Survey : पुन्हा नरेंद्र मोदी जगात नंबर वन

अमेरिकेतील कन्सल्टिंग फर्म मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या एका सर्व्हेनुसार ( American consulting firm Survey), ७६ टक्के ग्लोबल अप्रुव्हल रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हेचा डाटा ६ ते १२ सप्टेंबर २०२३ कालावधीमधील आहे. जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची जादू अजूनही कायम असल्याचे या सर्व्हेवरून दिसत आहे, असा दावा करण्यात आला आहे
अमेरिकेतील कंसल्टिंग फर्म ‘मॉर्निंग कंसल्ट’ च्या एका सर्व्हेनुसार, हा डाटा ६ ते १२ सप्टेंबर २०२३ पर्यंतचा आहे.या रेटिंगमध्ये १०० टक्के लोकांपैकी ५ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केलेले नाही. तसेच १८ टक्के लोकांनी डिसअप्रूव्हल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे ७६टक्के लोकांची पहिली पसंत म्हणून कायम आहेत. ६४ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत स्विस राष्ट्रपती एलेन बेर्सेट. याशिवाय, तिसऱ्या क्रमांकावर आहेत मॅक्सिकोचे राष्ट्रपती एन्ड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर. त्यांचे रेटिंग ६१ टक्के एवढी आहे.

(हेही वाचा : Sambhaji Chhatrapati : सोलापूर, माढ्यासह 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष 48 जागा लढणार)

महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन सातव्या आणि ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक १५ व्या क्रमांकावर आहेत. जगातील इतर काही बड्या नेत्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डिसल्व्हा, तर पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचा क्रमांक लागतो.याशिवाया इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या ४२ टक्क्यांच्या अप्रूव्हल रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.