अमेरिकेचं लढाऊ विमान चीनच्या समुद्रात कोसळलं, ७ जवान जखमी

80

अमेरिकेचे एफ-३५ हे लढाऊ विमान चीनच्या समुद्रात कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ७ जवान गंभीर जखमी झाले आहेत.वैमानिक या अपघातात सुखरुप बचावला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे लढाऊ विमान हे धावपट्टीवर उतरत होते त्यावेळी हा अपघात झाला. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हा अपघात झाला आहे. वैमानिकाने वेळेवर बाहेर पडण्याचे बटन दाबल्याने आणि वेळेत बाहेर उडी मारल्याने तो वाचला. अमेरिकन नौदलानुसार हेलिकॉप्टरद्वारे त्याला तातडीने समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. हा अपघात रविवारी झाला.

चार जवानांवर युद्धनौकेवरच उपचार सुरू

एफ-३५ सी लाइटनिंग-२ हे लढाऊ विमान युद्धनौका युएसएस कार्ल विंसनवर उतरत असताना हा अपघात झाला आहे. हे लढाऊ विमान दक्षिण चीन समुद्रात रोजच्या उड्डाणासाठी गेले होते. विमान उतरत असताना नौदलाचे सात जवान तिथे उपस्थित होते. ते जखमी झाले आहेत. यापैकी तीन जवानांना फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील मेडिकल ट्रिटमेंट फॅसिलिटी सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरित चार जवानांवर युद्धनौकेवरच उपचार करण्यात येत आहेत, असे नौदलाने म्हटले आहे.

(हेही वाचा – पंतप्रधानांकडून वर्धा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत )

दक्षिण चीन समुद्रात चीनसोबतच्या तणावामुळे अमेरिकेने आपली दोन विमानवाहू युद्धनौका तैनात केलेल्या आहेत. दक्षिण चीन समुद्रावरून चीन आणि अमेरिका अनेकदा आमनेसामने आले आहेत. तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये प्रचंड तणाव असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.