रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर, तस्लिमा नसरीन म्हणाल्या माझ्यावरही होऊ शकतो हल्ला

78

सॅटेनिक वर्सेस या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर काही दिवसांपूर्वी न्यूयाॅर्कमध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते बचावले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यादरम्यान, लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक मोठा दावा केला आहे. रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रमाणे माझ्यावरही हल्ला होऊ शकतो, असे तस्लिमा म्हणाल्या आहेत.

पाकिस्तानी धर्मगुरु अल्लामा खादिम हुसेन रिझवी यांना माझी हत्या करायची होती, असे तस्लिमा म्हणाल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेक्यांना रिझवी यांनी मला ठार मारण्यास सांगितले होते. असा दावा तस्लिमा नसरीन यांनी केला आहे. बांगलादेशात जन्मलेल्या लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या कथित इस्लामविरोधी वक्तव्याबद्दल यापूर्वी अनेक फतवे जारी केले गेले आहेत.

( हेही वाचा: MHADA Lottery: पुणेकरांचं हक्काचं घर होणार! म्हाडाकडून 5 हजारांहून अधिक घरांसाठी सोडत )

कोण आहेत तस्लिमा नसरीन

 

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला तस्लिमा यांनी त्यांच्या कादंबरीतून जगाचे लक्ष वेधून घेतले आणि त्यावेळी त्यांच्या लेखनाचे खूप कौतुक झाले. अयोध्या बाबरी विध्वंसानंतर, तस्लिमा यांची प्रसिद्ध कादंबरी लज्जा प्रकाशित झाली. त्यावेळी तस्लिमा यांना बांगला देशातून हाकलून देण्यात आले. त्यांच्या अनेक कादंब-याही प्रकाशित झाल्या ज्यात त्यांनी इस्लामबद्दलचे त्यांचे मत सांगितले आहे. एका वर्गाने त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले तर दुस-या वर्गाला या लिखाणाचा राग आला. बांगलादेशातही तिच्याविरोधात फतवा काढण्यात आला होता. त्याच्यावरही हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.