पटनामध्ये 55 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरु

60

बिहारमधील पटनाजवळ मणेर गावात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे ५५ जणांना घेऊन जाणारी बोट शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत उलटली. त्यामुळे या बोटीतील सर्वजण पाण्यात बुडाल्याने एकच भितीचे वातावरण पसरले. या अपघातानंतर ४५ जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर १० जण अद्याप बेपत्ता असल्याची भिती व्यक्त केली जात असून एनडीआरएफच्या पथकाकडून त्यांचा तपास सुरू आहे.

(हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद हायवेवर 118 किमी.च्या पट्ट्यात 29 धोकादायक ब्लॅक स्पॉट!)

यावेळी दानापूर एसडीएम घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी असे सांगितले की, १० लोकं अद्याप बेपत्ता आहेत आणि बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. बोटवरील सर्व लोक दाऊदपूर येथील रहिवासी आहे.

काय घडला प्रकार

दाऊदपूरचे राहणारे काही नागरिक रविवारी गंगा नदी पार करुन गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. दिवसभर चारा गोळा करुन हे सर्वजण घरी परतत होते. यावेळी तीन बोटींतून या सर्व नागरिकांनी परतीचा प्रवास सुरु केला. तीन बोटींमध्ये साधारण ५५ जण होते. नदीतून काठावर येत असताना, अचानक नदीचा प्रवाह बदलला आणि दोन बोटींनी एकमेकांना धडकल्या. या बोटीवरील बहुतांश लोक दानापूर शाहपूर भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना झाल्याचे समजताच आजूबाजूच्या लोकांनी मोठी गर्दी करण्यास सुरूवात केली. यानंतर संबंधितांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.