बहराइचमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू, 15 जखमी

113

उत्तरप्रदेशातील लखनऊ-बहराइच महामार्गावर आज, बुधवारी सकाळी रोडवेज बसला ट्रकने धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की, 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 100 फूट खोल दरीत कोसळला ट्रक)

काय घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास धुक्यामुळे लखनऊ इदगाह डेपोच्या रस्त्याच्या कडेला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. जरवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घर्घरा घाटाजवळ हा अपघात झाला. धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच सीओ आणि एसडीएम कैसरगंज घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त बस लखनऊहून बहराइचला जात होती.

फरार ट्रक चालकाचा शोध सुरू

या भीषण अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ट्रकची ओळख पटवण्यासाठी पोलिस जवळपासच्या ढाब्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही स्कॅन करत आहेत. डीएम डॉ. दिनेश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा अपघात ट्रक चुकीच्या बाजूने आल्यामुळे झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.