मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ५ ठार १३ जखमी

14
मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ५ ठार १३ जखमी
मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ५ ठार १३ जखमी

मुंबई-संभाजीनगर-नागपूरच्या जुन्या महामार्गावर ट्रक आणि एसटीची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार झाली की, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले. यामधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा – जम्मू-काश्मीर: जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक, मोठा रचत होता कट)

अपघाती बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळेस सिंदखेडराजा जवळ पळसखेड चमकत या गावाजवळ पहाटे ६.१५च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. यात बस चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-संभाजीनगर-नागपूर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. या अपघतामध्ये १३ जण जखमी झाले असून यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.