चेन्नईतील द्रौपदी अम्मन उत्सवात कोसळली क्रेन; ३ जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी

87

तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये अवराक्कोनम येथे असलेल्या मंदिर उत्सव कार्यक्रमात रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्सवादरम्यान एक क्रेन कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई जवळली नेमिलीच्या किलवीधी गावातील द्रौपदी अम्मन उत्सवात ही दुर्घटना घडली.

या घटनेबाबात रानीपेट जिल्हाधिकारी भास्कर पांडियन यांनी माहिती देताना सांगितले की, उत्सवात क्रेन वापरण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे क्रेन चालकाला अटक केली असून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, नेमिलीच्या मंडी अम्म मंदिरातील या उत्सवात शेकडो लोकं एकत्र आले होते. ही दुर्घटना माइलेरुच्या कार्यक्रमादरम्यान घडली. यावेळी लोकं क्रेनवर चढून मंदिरातील मूर्तींना हार घालण्याचा प्रयत्न करत होते.

क्रेन लोकांचे वजन झेलू शकली नाही आणि ती अचानक पडली. यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि १० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. मुथुकुमार, बुपालन आणि जोतिबाबू असे मृत व्यक्तींची नाव आहेत. तसेच जखमींना अराक्कोनम आणि तिरुवल्लुरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – औरंगाबादच्या कच-याच्या ढिगा-याला पुन्हा आग; 36 तासांनंतर आगीवर नियंत्रण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.