‘मराठी तर शिकावीच लागेल, मुजोरी खपवून घेणार नाही’; रिक्षा-टॅक्सी चालकांना मंत्री Pratap Sarnaik यांचा सज्जड दम

90
Petrol-Diesel Price Hike मुळे एसटी प्रवासाला बसणार फटका? परिवहनमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत
Petrol-Diesel Price Hike मुळे एसटी प्रवासाला बसणार फटका? परिवहनमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत
  • प्रतिनिधी

Pratap Sarnaik                    ​महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी सोमवारी आपली भूमिका अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट केली आहे. मंत्रालयात रिक्षा-टॅक्सी युनियनच्या नेत्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मंत्री सरनाईकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मराठी अनिवार्य ही शासनाची ठाम भूमिका आहे आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनीही या निर्णयाला आपली सहमती दर्शवली आहे. मात्र, काही संघटनांनी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ मागितली असून, त्यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – Markandey Katju यांच्या पुन्हा मर्कटलीला; डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवले विष्णुरूपात)

मंत्री ​प्रताप सरनाईकांनी परप्रांतीय चालकांना कडक शब्दांत सुनावले की, “महाराष्ट्रात धंदा करायचा असेल आणि इथे रोजगार मिळवायचा असेल, तर मराठी भाषा यायलाच हवी. आम्ही फक्त हिंदीतच बोलू, अशी मुजोरी आता चालणार नाही.” विशेष म्हणजे, मीरा-भाईंदरमधील ३०६५ परमिटची तपासणी केल्यानंतर मराठी न येणाऱ्यांची मोठी आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी राज्यातील ६९ आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत रिक्षाचालकांना नेमकी किती मुदतवाढ द्यायची, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – Mulund Fraud Case : ‘नवरदेवाने’ लुटले ३१ लाख; मुलुंडमधील धक्कादायक प्रकार)

​”आमचे उद्दिष्ट कोणाचाही रोजगार बुडवणे नाही, तर रोजगारात मराठी माणसाला आणि मराठी भाषेला प्राधान्य देणे हे आहे,” असेही मंत्री सरनाईकांनी नमूद केले. अनेक संघटनांनी स्वतःहून चालकांना मराठी शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी केलेल्या आरोपांवरून लक्ष भरकटवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याची टीका करत त्यांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या आरोपांना “मी कुणालाही भीक घालत नाही” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. आता मंगळवारच्या आरटीओ बैठकीनंतर रिक्षाचालकांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत मिळते की शासन अधिक कठोर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच प्रवाशांनीही चालकांशी मराठीतच संवाद साधावा, असे आवाहनही मंत्री सरनाईकांनी यावेळी केले. (Pratap Sarnaik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.