Worli Koliwada : वरळीतील मच्छिमारांच्या नौकेचे होते नुकसान, महापालिका बांधणार मोठी संरक्षक भिंत

नौका येण्या जाण्याच्या मार्गात समुद्राचे पाणी शिरु नये यासाठी समुद्राकडील बाजुस ७० मीटर लांब आणि जमिनीपासून ५ मीटर उंचीची आरसीसी भिंत बांधण्याची मागणी मच्छिमारांकडून केली जात असून या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

137
Worli Koliwada : वरळीतील मच्छिमारांच्या नौकेचे होते नुकसान, महापालिका बांधणार मोठी संरक्षक भिंत

मुंबईतील नाल्यातून वाहणारे पाणी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्या वरळीतील त्या क्लिव्हलँड पातमुखावरील संरक्षक भिंत समुद्रातील लाटांमुळे कोसळली आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्रांच्या लाटासोबत मोठमोठे दगड क्लिव्हलँड पातमुखात घुसतात व त्यामुळे मच्छिमारांच्या मासेमारी नौकांचे नुकसान होते. त्यामुळे नौका येण्या जाण्याच्या मार्गात समुद्राचे पाणी शिरु नये यासाठी समुद्राकडील बाजुस ७० मीटर लांब आणि जमिनीपासून ५ मीटर उंचीची आरसीसी भिंत बांधण्याची मागणी मच्छिमारांकडून केली जात असून या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. (Worli Koliwada)

वरळीतील क्लिव्हलँड बंदर पातमुखाच्या दक्षिण बाजुला जेट्टीची भिंत आणि उत्तर बाजुला दगडी संरक्षक भिंत आहे. जेट्टीची भिंत सुमारे १६० मीटर लांबीची आहे आणि दगडी संरक्षक भिंत सुमारे १८० मीटर लांब असून त्यापैंकी सुमारे ६० मीटर लांबीची भिंत ही भरतीच्या लाटाच्या प्रभावामुळे कोसळली. उर्वरीत १२० मीटर लांबीची भिंत ही जुनी दगडी आहे. त्यामुळे ती संरक्षक भिंत दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. (Worli Koliwada)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द, कारण? वाचा सविस्तर…)

आरसीसीची संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला लवकरच सुरुवात

वरळी कोळीवाडा येथील क्लिव्हलँड बंदर येथील आरसीसी भिंत समुद्राकडील भागा वाढवण्याची मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. पालकमंत्र्यासमवेत जिल्हा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेरी टाईम बोर्ड, मत्स्य व्यवसाय आयुक्त व स्थानिक रहिवाशांनी यांच्यासमवेत याची भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी या संरक्षक भिंतीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मागील वर्षी दिले होते. (Worli Koliwada)

पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वरळी कोळीवाडा येथील क्लिव्हलँड बंदर येथे पातमुखातील पाणी नौका येण्या जाण्याच्या मार्गात जाण्यापासून रोखण्यासाठी पातमुखाच्या समुद्राकडील बाजुस आरसीसीची संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केले जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कामासाठी सुमती सोल्युशन या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी विविध करांसह सुमारे ९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (Worli Koliwada)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.