World Health Organization : महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेचे प्रमाण जास्त; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

98
World Health Organization : महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेचे प्रमाण जास्त; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा
World Health Organization : महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेचे प्रमाण जास्त; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

महिलांना थकवा जाणवणे, चिडचिडेपणा असे त्रास काही वेळा जाणवतात, मात्र काही दैनंदिन जीवनात, असे घडणारच असे मानून या समस्यांकडे महिला (women) दुर्लक्ष करतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) एका अहवालात म्हटले आहे.

महिलांमध्ये रक्ताची, लोहाची कमतरता (iron deficiency) जास्त प्रमाणात आढळते. या अवस्थेला ‘अॅनिमिया’ म्हणतात. तरुण महिलांमध्ये आयर्नची कमतरता वाढू लागली आहे. २१ वर्षांपर्यंतच्या १७ टक्के महिला आणि तरुणींमध्ये आयर्नची अर्थात लोहाचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षात आल्याची माहितीही या संस्थेने दिली आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणाचे उद्धव ठाकरेंसोबत कनेक्शन, फडणवीसांचा खळबळजनक दावा)

ही स्थिती अजून काही काळ राहिल्यास त्याचे रुपांतर तणाव, वैफल्य तसेच ह्रदयासंबंधी विकारात होऊ शकते. तांबड्या रक्तपेशींचे प्रमाण राखण्यात शरीरातील लोह महत्त्वाचे असते. आयर्न कमी असल्यानंतर शरीराची ऊर्जा जास्त प्रमाणात खर्च होते. याचा परिणाम ह्रदय, मेंदू आणि ह्रदयाच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

आयर्नच्या कमतरतेची लक्षणे आणि आहार
– श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा, चक्कर येणे, विचारांत अस्पष्टता, थंड तापमानाबद्दलच्या संवेदनशीलतेत वाढ, ह्रदयाच्या ठोक्यात अनिश्चितता इत्यादी लक्षणे आढळतात.
– आहारात सफरचंद, बीट, पालक, डाळिंब यांचा समावेश करणे आवश्यक आहे तसेच अंडी, मासे, डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा, अशी माहिती तज्ज्ञ देतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.