-
प्रतिनिधी
CM Devendra Fadnavis नागपूर येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन तसेच व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प नागपूरच्या आर्थिक विकासाला, पर्यटनाला, उद्योगांना आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना देणारा ठरणार असून तो २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली. (CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर कन्व्हेंन्शन सेंटरसंदर्भात सादरीकरण बैठक झाली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, कन्व्हेन्शन सेंटर केवळ परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र न राहता ते नागपूरच्या ओळखीचे सांस्कृतिक केंद्र ठरावे. यासाठी वास्तूरचना अत्यंत आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि पर्यावरणपूरक असावी. आधुनिक वास्तुशैलीसोबतच ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांचा वापर करावा. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Heavy Rain : महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; भारतातील २२ राज्यांना हवामान खात्याचा इशारा)
या प्रकल्पाच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पर्यटन तसेच संबंधित सेवा क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ घडविणारे केंद्र म्हणून विकसित करण्यात यावे. नागपूरला जागतिक दर्जाचे परिषद, प्रदर्शन, पर्यटन आणि उद्योग केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)
या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया, निविदा, जमीन हस्तांतरण, बांधकाम आणि इतर आवश्यक कामे कालमर्यादेत पूर्ण करून प्रकल्प नियोजित वेळेत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे व त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देशही फडणवीस यांनी बैठकीत दिले. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

