Heavy Rain : महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; भारतातील २२ राज्यांना हवामान खात्याचा इशारा

पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

116
Maharashtra Weather updates
राज्यातील हवामानाचा आजचा अंदाज

जुलै महिन्याचा शेवटचा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी धोकादायक ठरु शकतो. 31 जुलैला महाभयानक पाऊस (Heavy Rain) पडणार आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, भारतातील २२ राज्यांना IMD ने मोठा अलर्ट दिला आहे.

पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी सुमारे २०० मिमीपर्यंत पावसाची (Heavy Rain) नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच अनावश्यक काम असल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले.

(हेही वाचा हॉटेल परवाना निलंबनाची सुनावणी सुरु असतानाच FDA ने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनलाच ठोकले टाळे)

अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट

पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशीम, वर्धा, हिंगोली, परभणी, नांदेड, आणि बुलढाणा या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy Rain)

भारतातील २२ राज्यांना IMD अलर्ट

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, उत्तराखंडसह २२ राज्यांना IMD ने अलर्ट दिला आहे. (Heavy Rain)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.