-
प्रतिनिधी
Crime सरकारी आरोग्य योजनांना चुना लावणारा एक मोठा आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांमध्ये तब्बल १,७९,४२,९५०(१ कोटी ७९ लाख ४२ हजार ९५० रुपये) फसवणूक केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Crime)
बनावट कागदपत्रे आणि खोट्या उपचारांचे रेकॉर्ड सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे (State Health Assurance Society) मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत विभुते यांनी याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. (Crime)
(हेही वाचा – हॉटेल परवाना निलंबनाची सुनावणी सुरु असतानाच FDA ने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनलाच ठोकले टाळे)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय आरोग्य योजनांतर्गत दाखल केलेल्या दाव्यांची (Claims) कसून छाननी करण्यात आली. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली की, एकूण ३६१ प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात कोणत्याही रुग्णाला वैद्यकीय सेवा किंवा उपचार मिळालेले नसताना कागदोपत्री उपचार झाल्याचे दाखवण्यात आले. आरोपींनी लाभार्थी नागरिकांच्या मूळ कागदपत्रांचा गैरवापर करून ‘जीवनदायी’ पोर्टलवर बोगस व बनावट रेकॉर्ड अपलोड केले. याद्वारे ऑनलाईन विमा दावे मंजूर करून घेत सरकारी तिजोरीला १.७९ कोटी रुपयांचा चुना लावला. (Crime)
नाशिकमधील तीन नामांकित रुग्णालयांचे चालक आणि पदाधिकारी या घोटाळ्यात थेट अडकले असून, त्यांच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत : (Crime)
- शिव मल्टिस्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, सातपूर, नाशिक,
- आरोपी हॉस्पिटलचे संस्थापक व खातेदार (Account Holder).
- १६३ बोगस दाव्यांद्वारे तब्बल ७१.८३ लाख लाटल्याचा आरोप.
- नाशिक ग्रेस हॉस्पिटल, सिडको, नाशिक
- आरोपी : संस्थापक व अधिकृत स्वाक्षरीकर्ता (Authorised Signatory).
- गैरव्यवहार : १२६ प्रकरणांमध्ये ६२.१३ लाख इतकी रक्कम बेकायदेशीरपणे लाटल्याचा आरोप.
- ऋषिकेश हॉस्पिटल, गंगापूर रोड, नाशिक
- आरोपी : संस्थापक व अधिकृत स्वाक्षरीकर्ता.
- गैरव्यवहार : ७२ बोगस दाव्यांच्या माध्यमातून
- ४५.४५ लाख रकमांचे अपहार.
(हेही वाचा – Heavy Rain : महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; भारतातील २२ राज्यांना हवामान खात्याचा इशारा)
वरळी पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात विविध कलमांन्वय गुन्हा दाखल केला असून, या महाघोटाळ्यात इतर कोण-कोण व्यक्ती किंवा रॅकेट सामील आहे, याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलीस तपास वेगाने सुरू आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

