Women Entrepreneurship : भारतात ६३ टक्के महिलांना उद्योजकतेची ओढ

पेनिअर बाय संस्थेच्या वुमन फायनान्शिअल इंडेक्सने महिलांविषयी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. 

99
Women Entrepreneurship : भारतात ६३ टक्के महिलांना उद्योजकतेची ओढ

देशातील ६३ टक्के महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची आस आहे. आणि त्यातून या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन शिकायचं आहे, असा एक राष्ट्रीय स्तरावरील एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. पेनियरबाय या संस्थेनं ‘विमेन फायनान्शिअल इंडेक्स’ अहवाल तयार केला आहे. आणि त्यासाठी रिटेल क्षेत्रात स्त्रियांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. (Women Entrepreneurship)

महिला वर्ग डिजिटल क्रांतीतही अग्रेसर असल्याचं या अहवालातून स्पष्ट होत आहे. १८ ते ३० आणि ३१ ते ४० वर्षं वयोगटातील स्त्रिया ऑनलाईन पैशाचे व्यवहार आत्मविश्वासाने करतात. आणि बँकिंग व्यवहार तसंच पैशाची देवाण घेवाण महिला ऑनलाईन पद्धतीने करतात असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तरीही एकूण महिलांमध्ये ४८ टक्के महिला अजूनही रोखीनेच पैशाचे व्यवहार करतात ही गोष्टही या अहवालातून अधोरेखित होते. ४१ टक्के महिलांनी आर्थिक व्यवहारांसाठी कुठलंही फोन ॲप आजतागायत वापरलेलं नाही. (Women Entrepreneurship)

(हेही वाचा – PM मोदींच्या हस्ते देशभरातील डिजिटल क्रिएटर्सचा गौरव! पहिल्यांदाच कोणाला मिळाले पुरस्कार; वाचा सविस्तर)

देशाच्या औपचारिक अर्थव्यवस्थेत महिलांना व्हायचं सहभागी 

महिलांचे आर्थिक व्यवहार हे खासकरून रोख पैसे काढणे, मोबाईल रिचार्ज आणि बिलांचा भरणा यांच्याशी निगडित आहेत. महिलांना पैशाची बचत करताना मुलांचं शिक्षण, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि घरातील वस्तूंची खरेदी या गोष्टीत विशेष रस आहे. पण, महिलांमध्ये गुंतवणुकीची साधनं आणि त्यात नियमित गुंतवणूक करण्याविषयी चांगली सजगता असल्याचंही पेनियरबाय संस्थेच्या या अहवालातून स्पष्ट होत आहे. ७४ टक्के महिला कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेऊन आर्थिक गुंतवणुकीविषयीचे निर्णय घेतात, असं दिसून आलं आहे. पण, या अहवालातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील ६३ टक्के महिला कौटुंबिक उत्पन्न वाढवण्याचा आणि त्यासाठी काहीतरी उद्योग करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. देशाच्या औपचारिक अर्थव्यवस्थेत महिलांना सहभागी व्हायचं आहे. आणि त्यासाठी कौशल्य विकासाच्या संधीही त्या शोधत आहेत. (Women Entrepreneurship)

पेनियरबायच्या सीएमओ जायत्री दासगुप्ता म्हणाल्या, ‘भारत डिजिटल स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर आहे आणि आपली संपूर्ण क्षमता आजमावण्यासाठी आपण स्त्रियांना आवश्यक ती साधने पुरवली पाहिजेत. ज्यामुळे त्यांना या वेगाने बदलत असलेल्या डिजिटल परिस्थितीत सहजपणे समाविष्ट होता येईल. महिलांना देशाच्या आर्थिक प्रगतीत समान वाटा मिळावा या उद्देशानेच विमेन फायनान्शिअल इंडेक्स काढला आहे. त्यामुळे महिलांच्या गरजा आणि तयारी समाजाला समजेल,’ असं पेनिबायरच्या सीएमओ जायत्री दासगुप्ता यांनी म्हटलं आहे. संस्थेनं त्यासाठी नुकताच डिजिटल नारी हा उपक्रमही सुरू केला आहे. आणि त्या माध्यमातून दुर्गम भागातील महिलांना आर्थिक उत्पन्नांचे स्त्रोत मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. (Women Entrepreneurship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.