PM मोदींच्या हस्ते देशभरातील डिजिटल क्रिएटर्सचा गौरव! पहिल्यांदाच कोणाला मिळाले पुरस्कार; वाचा सविस्तर

एका निवेदनात पंतप्रधान कार्यालयानं (PMO) म्हटलंय की, हा पुरस्कार कथाकथन, सामाजिक बदलांचे समर्थन, पर्यावरणीय स्थिरता, शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी आणि प्रभावाला ओळख देण्यासाठीचा प्रयत्न आहे.

97
PM मोदींच्या हस्ते देशभरातील डिजिटल क्रिएटर्सचा गौरव! पहिल्यांदाच कोणाला मिळाले पुरस्कार; वाचा सविस्तर
PM मोदींच्या हस्ते देशभरातील डिजिटल क्रिएटर्सचा गौरव! पहिल्यांदाच कोणाला मिळाले पुरस्कार; वाचा सविस्तर

सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात डिजिटल क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सची चलती आहे. त्यांचा प्रभाव आणि वेगळ्या क्षेत्रातील मुशाफिरीची सरकारलाही भुरळ पडलीए. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यंदा पहिल्यांदाच नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड या डिजिटल क्रिएटर्सना देण्यात आले. नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये शुक्रवारी हा सोहळा पार पडला. (first ever national creators award given by pm narendra modi)

२० कॅटेगिरीत देण्यात आले पुरस्कार
विविध २० कॅटेगिरीमध्ये हे अॅवॉर्ड देण्यात आले आहेत. ज्यामध्ये बेस्ट स्टोरी टेलर, द डिसर्पटर, सेलिब्रेटी क्रिएटर, ग्रीन चॅम्पिअन, दि बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज, मोस्ट इम्पॅक्टफुल अॅग्री क्रिएटर, कल्चरल अॅम्बेसिडर, बेस्ट ट्रॅव्हल क्रिएटर, स्वच्छ अॅम्बेसिडर, न्यू इंडिया चॅम्पियन, टेक क्रिएटर, हेरिटेज फॅशन, मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर, बेस्ट क्रिएटर इन फूड कॅटेगिरी, दि बेस्ट क्रिएटर इन एज्युकेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिएटर अॅवॉर्ड या अॅवॉर्ड्सचा यामध्ये समावेश आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे वक्तव्य…
दरम्यान, एका निवेदनात पंतप्रधान कार्यालयानं (PMO) म्हटलंय की, हा पुरस्कार कथाकथन, सामाजिक बदलांचे समर्थन, पर्यावरणीय स्थिरता, शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी आणि प्रभावाला ओळख देण्यासाठीचा प्रयत्न आहे.

पुरस्कार मिळालेले फेमस युट्यूबर्स ?

जया किशोरी – सामाजिक परिवर्तनासाठी सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार

कविता सिंग (कबिताचे किचन) – फूड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार

ड्रू हिक्स – सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय निर्माता पुरस्कार

कामिया जानी – फेव्हरेट ट्रॅव्हल क्रिएटर अवॉर्ड

रणवीर अल्लाबदिया (बीरबायसेप्स) – डिसप्टर ऑफ द इयर अवॉर्ड

RJ Raunac (Bauaa) – मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर-मेल पुरस्कार

श्रद्धा – मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर (महिला) पुरस्कार

अरिदामन – सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर पुरस्कार

निश्चय – गेमिंग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार

अंकित बैयनपुरिया – सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस निर्माता पुरस्कार

नमन देशमुख – शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार

जान्हवी सिंग – हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार

मल्हार कळंबे – स्वच्छता दूत पुरस्कार

गौरव चौधरी – टेक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार

मैथिली ठाकूर – कल्चरल ॲम्बेसेडर ऑफ द इयर पुरस्कार

पंक्ती पांडे – फेव्हरेट ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड

कीर्तिका गोविंदासामी – सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार

अमन गुप्ता – सेलिब्रिटी क्रिएटर अवॉर्ड प्रदान

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.