Famous writer Sudha Murthy: प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’द्वारे शेअर केली पोस्ट

239
Famous writer Sudha Murthy: प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X'द्वारे शेअर केली पोस्ट
Famous writer Sudha Murthy: प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X'द्वारे शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती (Famous writer Sudha Murthy) यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अधिकृत ट्विटर हँडल ‘X’वर या संदर्भातली पोस्ट शेयर करत माहिती दिली आहे.

पंतप्रधानांनी ‘X’वर म्हटले आहे की, ‘मला आनंद आहे की, भारताच्या राष्ट्रपतींनी @SmtSudhaMurty यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये सुधाजी यांचे योगदान अफाट आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या ‘नारी शक्ती’ चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे भवितव्य घडवणाऱ्या महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे एक उदाहरण आहे. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.