Bandra Worli Sea Link : अफाटतेचे आणि सुंदरतेचे मूर्त स्वरुप

केबल्सचा आधार असलेला हा अतिशय लांब आणि रुंद पूल तुमचे लक्ष वेधून घेतो.

106
Bandra Worli Sea Link : अफाटतेचे आणि सुंदरतेचे मूर्त स्वरुप

Bandra Worli Sea Link : तुम्ही मुंबईकर आहात? किंवा मुंबईला फिरायला जाणार आहात, वांद्रे-वरळी सी लिंक ब्रिज (bandra worli sea link) पाहायलाच हवा. केबल्सचा आधार असलेला हा अतिशय लांब आणि रुंद पूल तुमचे लक्ष वेधून घेतो. वरळी सी फेस आणि वांद्रे बँडस्टँडवरून हा पूल पाहिल्यावर एक वेगळीच प्रसन्नता उत्पन्न होते. (Bandra Worli Sea Link)

संध्याकाळी किंवा चांदण्या रात्री हा पूल दिसला तर मन प्रफुल्लित होते. जेव्हा जेव्हा भारतात अभियांत्रिकीच्या कौशल्याची चर्चा होते तेव्हा तेव्हा वांद्रे-वरळी सी लिंक ब्रिजचे (bandra worli sea link) नाव नक्कीच पुढे येते. या ५.६ किलोमीटर लांबीच्या पूलामुळे वांद्रे ते वरळी हा एक तासाचा प्रवास १० मिनिटांत पूर्ण होतो. (Bandra Worli Sea Link)

वांद्रे-वरळी सी लिंकचे (bandra worli sea link) बांधकाम २००९ मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी १,६०० कोटी रुपये खर्च झाले. २०१० मध्ये या पुलाच्या सर्व ८ लेन लोकांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या. या पुलाला राजीव गांधी सी लिंक म्हणूनही ओळखले जाते. हा पूल बांधण्यासाठी ९० हजार टन सिमेंट वापरण्यात आले आहे. (Bandra Worli Sea Link)

(हेही वाचा – बोगस कागदपत्रे तयार करून MMRDA ची घरे लाटण्याचा प्रयत्न; ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १२ जणांना अटक)

या पुलाचे वजन ५० हजारांहून अधिक

वांद्रे वरळी सी लिंक ब्रिज (bandra worli sea link) बांधण्यासाठी एवढ्या वायरचा वापर करण्यात आला आहे की ह्या वायर्स संपूर्ण पृथ्वीला गुंडाळता येईल. एवढेच नाही तर या पुलाचे वजन ५० हजारांहून अधिक आफ्रिकन हत्तींच्या वजनाएवढे आहे. हा पूल भारतातील पहिला ८-लेन आणि सर्वात लांब सागरी पूल आहे. या पूलाची लांबी ५.६ किलोमीटर एवढी आहे. (Bandra Worli Sea Link)

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वांद्रे-वरळी सी-लिंक (bandra worli sea link) बांधण्यात इजिप्त, चीन, कॅनडा, स्वित्झर्लंड, ब्रिटन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि सर्बिया यासह इतर ११ देशांचा सहभाग होता. वांद्रे-वरळी सी-लिंक बद्दल (bandra worli sea link) ही अद्भुत माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली ना! मग आता वांद्रे-वरळी सी-लिंक (bandra worli sea link) ला नक्की भेट द्या आणि निसर्ग व मानवाची कलाकृती अवश्य पाहा. (Bandra Worli Sea Link)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.