सीबीआयच्या प्रमुखपदासाठी ‘या’ अधिकाऱ्यांमध्ये चुरस!

सध्या सीबीआयच्या प्रमुख पदावर प्रवीण सिन्हा हे प्रभारी आहेत. 

65

सध्या सीबीआयच्या प्रमुख पदावर प्रभारी म्हणून प्रवीण सिन्हा हे आहेत, आता त्या पदावर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ मे रोजी उच्च स्तरीय समितीची बैठक घेणार असल्याचे समजते. त्यानंतर यावर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

या उच्च स्तरीय समितीच्या अध्यक्षपदी स्वतः पंतपधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा आणि लोकसभेचे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार १९८४ आणि १९८५ या बॅचचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना, वाय.सी. मोदी आणि सुबोध जयस्वाल हे अधिकारी या पदाच्या शर्यतीत आहेत. सध्याचे प्रभारी म्हणून प्रवीण सिन्हा हे १९८८च्या बॅचचे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ३ फेब्रुवारी रोजी ऋषी कुमार शुक्ला यांचा सीबीआयच्या प्रमुख पदावरचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांची ४ फेब्रुवारी २०१९ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्या जागी प्रवीण सिन्हा यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

(हेही वाचा : अधिकाऱ्यांवरचा अतीविश्वास मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार का?)

हे आहेत स्पर्धेत! 

  • सुबोध कुमार जयस्वाल – १९८५चे बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक आहेत.
  • राकेश अस्थाना – १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हे सध्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आहेत.
  • वाय.सी. मोदी  – १९८४ च्या बॅचचे आयपीएसअधिकारी आहेत. सध्या ते भारत – तिबेट सीमा पोलिस दलाचे महासंचालक आहेत.
  • एच.सी. अवस्थी – १९८५ च्या बॅचचे हे आयपीएस अधिकारी असून ते सध्या उत्तर पोलिस दलाचे महासंचालक आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.