Western Railway Block : हार्बर नंतर आता पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक, २५० लोकल होणार रद्द; कारण…

63
Western Railway Block : हार्बर नंतर आता पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक, २५० लोकल होणार रद्द; कारण...

काही दिवसांपूर्वी मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे नोकरदारांना कामावर जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अशातच आता पश्चिम रेल्वेने (Western Railway Block) देखील १० दिवसांचा ब्लॉक घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच या दहा दिवसांमध्ये म्हणजेच २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल २५० लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नोकरदार वर्गाला कामावर वेळेत पोहोचण्यासाठी कष्ट करावे लागणार आहे.

या कारणासाठी घेण्यात आला ब्लॉक

मागील १५ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली (Western Railway Block) यादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे काम पश्चिम रेल्वेने सुरू करण्याचे ठरवले आहे. सध्या प्राथमिक काम सुरू असून मुख्य काम दसऱ्यानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून यामध्ये रोज सरासरी २५० लोकल आणि ६१ मेल-एक्स्प्रेस रद्द (Western Railway Block) करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Toll Booth Protest : टोलनाका आंदोलन, ३ गुन्हे दाखल, १३जणांना अटक )

मुंबई लोकलवर कमीत कमी परिणाम होईल – श्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी

या ब्लॉकची (Western Railway Block) माहिती देतांना मुंबई लोकलवर कमीत कमी परिणाम होईल यादृष्टीने रेल्वे अधिकाऱ्यांनी नियोजन केले असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले. रूळजोडणीच्या कामासाठी रुळांवरील वाहतूक थांबवणे गरजेचे आहे. मुंबई लोकल सलग काही दिवस बंद ठेवणे अव्यवहार्य असल्याने ब्लॉककाळात काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहाव्या मार्गिकेमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त (Western Railway Block) जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत २० टक्के वाढ अपेक्षित आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.