Congress : कॉंग्रेसचा ठराव म्हणजे तुष्टीकरणाच्या राजकारणाचा कळस

भाजपचे खासदार मनोज कोटक यांचा घणाघात

112
Congress : कॉंग्रेसचा ठराव म्हणजे तुष्टीकरणाच्या राजकारणाचा कळस
Congress : कॉंग्रेसचा ठराव म्हणजे तुष्टीकरणाच्या राजकारणाचा कळस

हमास या दहशतवादी संघटनेने अचानक हल्ला करून शेकडो निरपराध इस्राईली नागरिकांचा बळी घेतला आहे. असे असताना कॉंग्रेसने (Congress) पॅलेस्टाईनची बाजू घेणे घोर निंदनिय असल्याचे मत भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी आज ‘हिंदुस्तान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केले.

ईशान्य मुंबईहून भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी कॉंग्रेसचा (Congress) खरपूस समाचार घेत तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. कॉंग्रेसने आजच्या कार्यसमितीच्या बैठकीत पॅलेस्टाईनच्या बाजूने ठराव पारित केला आहे.

या ठरावात म्हटले आहे की, ‘कॉंग्रेस कार्यसमिती मध्य आशियात सुरू युध्दात मृत्यूमुखी पडलेल्या हजारो नागरिकांप्रती आपली संवेदना व्यक्त करते. पॅलेस्टाईनची जनता स्वत:ची जमीन, स्वशासन आणि आत्मसन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. कॉंग्रेसने सुरवातीपासून त्यांना पाठिंबा दिला आहे. दोन्ही देशांतील युध्द ताबडतोब थांबावे आणि दोन्ही देशांमध्ये वितुष्ट निर्माण करणारे मुद्ये चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यात यावे असे कॉंग्रेस आवाहन करीत आहे’.

(हेही वाचा-Western Railway Block : हार्बर नंतर आता पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक, २५० लोकल होणार रद्द; कारण…)

यावर बोलताना मनोज कोटक म्हणाले की, कॉंग्रेसचा ठराव हा तुष्टीकरणाच्या राजकारणातून आलेला ठराव आहे. हमास ही दहशतवादी संघटना आहे. हमासने इस्राईलवर धोक्यो केलेल्या हल्ल्यात मोठा नरसंहार झाला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सैनिकांचे अपहरण केले. किती तरी कुटुंबांना ताब्यात घेतले आहे. मुलांची हत्या करीत आहेत. महिलांवर अत्याचार केला जात आहे.

हमासच्या या कुकृत्यावर कॉंग्रेसने साधा शब्द सुध्दा काढला नाही. इस्राईलने केलेला प्रतिहल्ला स्वत:चे सार्वभौमत्व वाचविण्यासाठी केला आहे, हे एक सत्य असून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र, कॉंग्रेसने स्विकारलेले धोरण म्हणजे तुष्टीकरणाचे केविलवाणे राजकारण होय, असेही मनोज कोटक यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते श्याम जाजू यांनी सुध्दा कॉंग्रेसवर आंतरराष्ट्रीय संबधांमध्ये राजकारण आणण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, जगप्रसिध्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच इस्राईलला पाठिंबा दर्शविला आहे. यानंतरही कॉंग्रेसने भारत सरकारपेक्षा वेगळी भूमिका घेणे म्हणजे अपमानजनक आहे, असे ते म्हणाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.