Weather Forecast: १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार, हवामान विभागाचा अंदाज; वाचा सविस्तर

162
Weather Forecast: १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार, हवामान विभागाचा अंदाज; वाचा सविस्तर
Weather Forecast: १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार, हवामान विभागाचा अंदाज; वाचा सविस्तर

मुंबई शहर आणि उपनगरात गुलाबी थंडीमुळे आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. मुंबईचे किमान तापमान माथेरानपेक्षाही १ अंशाने कमी नोंदवण्यात आले आहे. माथेरानमध्ये १५, तर मुंबईत १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आणखी दोन मुंबईत थंडी राहील, त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Forecast) वर्तवली आहे.

उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यातील शहरांचे किमान तापमान खाली घसरत आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईत थंडी कायम राहील, नंतर किमान तापमान २० अंश नोंदवण्यात येईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Shri Ram Vatika Oxygen Hub: देशातील पहिला ‘श्रीराम वाटिका’ ऑक्सिजन हब राष्ट्राला अर्पण – विजया रहाटकर )

पावसाची शक्यता नाही

१ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान १४, तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० म्हणजे दोन्हीही त्यांच्या सरासरी इतके किंवा त्यापेक्षा एखाद्या अंशाने कमी असू शकते. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही, मात्र विदर्भ वगळता महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही, मात्र विदर्भातील तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे तेथे थंडी कमी होईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.