संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

126
संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथील तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १३) संपूर्ण शहरासह कात्रज, भारती विद्यापीठ, सहकारनगर, कोंढवा, येवलेवाडी, आंबेगाव, सुखसागर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द व बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ या परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच राजीव गांधी पंपिंग स्टेशनच्या क्षेत्रात येणाऱ्या सच्चाई माता टाकी, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द व बुद्रुक, वंडर सिटी, मोरेबाग, बालाजीनगर, पवार हॉस्पीटल परिसर, सुखसागरमधील भाग क्रमांक एक व दोन, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलारमळा, कात्रज गावठाण, जुन प्रभाग ३८ मधील वरखडेनगर, संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी या परिसरामध्येही गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.

(हेही वाचा – PM Narendra Modi : प्रत्येक सेकंदाचा पुरेपूर उपयोग करा; पंतप्रधान मोदींचे तरुणांना आवाहन)

दुसऱ्या दिवशी १४ जुलै रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे सोमवार ते बुधवार या कालावधीत आणि शुक्रवार ते रविवार या कालावधीत संबंधित भागासाठी पाणी कपात असणार नाही, सोमवारी (ता. १७) पासून पूर्वीच्या नियोजनासह सर्व भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या परिसराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळित होता. संबंधित परिसरातील दररोज एका भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जात होता. आता मात्र एकाच दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.