Vasai Accident : वसईच्या बाभोला परिसरात मोटरसायकल-कारची भीषण धडक

Vasai Accident : या अपघातात मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

219
Vasai Accident : वसईच्या बाभोला परिसरात मोटरसायकल-कारची भीषण धडक
Vasai Accident : वसईच्या बाभोला परिसरात मोटरसायकल-कारची भीषण धडक

वसई पश्चिमेच्या बाभोला परिसरात रात्रीच्या भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल आणि चारचाकी वाहन यांची समोरासमोर धडक झाली. (Vasai Accident) या धडकेमध्ये मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा – Cash for query : महुआ मोईत्रा यांना EDचे समन्स; 19 फेब्रुवारीला होणार चौकशी)

या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने येथे अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

दोन्ही वाहनांचे नुकसान

प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत कुटीनो हा जिम मधून आपल्या घरी दुचाकीवर वसईला जात होता. त्याच वेळी समोरून चारचाकी गाडी ही वसई स्टेशनच्या दिशेने येत होती. त्यामुळे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक प्रचंड जोरदार असल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. कारचे एअरबॅग उघडल्याने कारमधील वाहनचालकाला कोणतीही जखम झाली नाही. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.