१ मेपासून Unwanted Call पासून होणार सुटका; सरकारने मोबाईल कंपन्यांना दिला मोठा आदेश

93

कोणतेही महत्त्वाचा काम करत असताना अनेकदा नको असलेला फोन येतात. यामुळे लोकांना खूप मनस्ताप होतो. हीच बाब लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल कंपन्यांना १ मेपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर बसवण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे लोकांना नको असलेल्या फोनमुळे होणार मनस्ताप थांबणार आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या तत्त्वांनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर हे नको असलेले फोन थांबवतील, म्हणजेच लोकांच्या नंबरपर्यंत पोहोचणार नाहीत. यामुळे महत्त्वाच्या कामाच्या वेळात येणारे नको असलेले फोन किंवा स्पॅम फोन त्रास देऊ शकणार नाहीत. त्यापूर्वीच ते फोन कनेक्शन खंडित केले जाईल. या सेवेसाठी सर्व मोबाईल कंपन्यांना एकच कॉमन प्लॅटफॉर्म असणार आहे. या कॉमन प्लॅटफॉर्मवर कंपन्यांना ब्लॉक नंबरची माहिती द्यावी लागेल. या कारवाईसाठी ट्रायने कंपन्यांना १ मेपर्यंत मुदत दिली आहे. १ मेनंतर अशा नंबरवरून येणारे फोन फक्त नेटवर्कवर ब्लॉक करावे लागतील.

दरम्यान यामुळे बँक आणि इतर महत्त्वाची माहिती असलेले नंबर देखील ब्लॉक होऊ शकतात. याबाबत ट्रायने सांगितले आहे की, बँक, आधार किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सेवेशी संबंधित मेसेज आणि फोनसाठी स्वतंत्र सीरीज नंबर जारी केले जातील. याशिवाय इतर सर्व नंबर ब्लॉक केले जातील.

(हेही वाचा – पॅन – आधार कार्ड लिंक करण्यास शेवटची संधी! मिळाली ३ महिन्यांची मुदतवाढ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.