Unseasonal Rain : कोकणासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; भातशेती संकटात

105
Unseasonal Rain : कोकणासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; भातशेती संकटात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. (Unseasonal Rain) काही ठिकाणी संततधार तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. ऐन भात कापणीच्या हंंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली होती. भारतीय हवामान विभागाने कोकणात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. (Unseasonal Rain)

कोकणात विजांचा कडकडाट

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

(हेही वाचा – Sangeeet Matsyagandha Cancelled : ‘डीजे’च्या गोंगाटाचा नाटकाला फटका; संगीत ‘मस्त्यगंधा’च्या टीमने का व्यक्त केली दिलगिरी)

मध्य महाराष्ट्रात द्राक्ष बागा संकटात

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. सांगली जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका निर्माण झाला आहे. (Unseasonal Rain)

गोव्यात मध्यम ते जोरदार

गोव्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या गडगडाटासह पावसाची रिपरिप आताही सुरूच आहे. गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार, दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, आगामी तीन ते चार तासांमध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये गोव्यात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो.  (Unseasonal Rain)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.