Sangeeet Matsyagandha Cancelled : ‘डीजे’च्या गोंगाटाचा नाटकाला फटका; संगीत ‘मस्त्यगंधा’च्या टीमने का व्यक्त केली दिलगिरी

43
Sangeeet Matsyagandha Cancelled : 'डीजे'च्या गोंगाटाचा नाटकाला फटका; संगीत 'मस्त्यगंधा'च्या टीमने का व्यक्त केली दिलगिरी

पुण्यात गोंगाटामुळे ‘संगीत मत्स्यगंधा’ या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची वेळ आली. (Sangeeet Matsyagandha Cancelled) अभिषेकी बुवा यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील कर्वे रोडवरील ‘द बॉक्स’ या नाट्यगृहात ‘मस्त्यगंधा’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. कलाद्वयी संस्थेतर्फे एरंडवण्यातील ‘द बॉक्स’ या नाट्यगृहात हा प्रयोग होता. मात्र प्रयोग रद्द करण्यात आल्याने कलाकार आणि रसिक नाराज झाले.

शेजारील कार्यक्रमाच्या आवाजाच्या दणदणाटामुळे नाटकावर पडदा पडला आहे. ‘डीजे’च्या स्पीकरचा संगीत नाटकाला फटका बसला आहे. आवाजाच्या दणदणाटामुळे ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. नाट्यगृहाशेजारी असलेल्या दुसर्‍या सभागृहात सुरू असलेल्या कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकांचा आवाज प्रमाणापेक्षा अधिक झाला. शेजारच्या आवाजाच्या पातळीने मर्यादा ओलांडल्याने कलाकारांना सादरीकरण करणे अशक्य झाले आणि अखेर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर नांदी सादर करून प्रयोग रद्द करण्यात आला. (Sangeeet Matsyagandha Cancelled)

(हेही वाचा – Congress MLA Arrested : आसाममध्ये आमदाराला अटक; हिंदूंविषयी केली होती ‘ही’ आक्षेपार्ह विधाने)

वारंवार विनंती करूनही ‘पुणे स्टुडिओ’मध्ये पार पडत असलेल्या कार्यक्रमाचा आवाज कमी झाला नाही. अखेर ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटाकाच्या टीमने नाट्यगृहाबाहेर येत रसिकांची क्षमा मागत प्रयोग रद्द करत असल्याची घोषणा केली.

नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागल्याने ‘संगीत मत्यस्यगंधा’च्या टीमकडून सखेद दिलगिरी व्यक्त करण्यात आली.  “काल आणि आज संगीत मत्यस्यगंधा’चे प्रयोग ‘द बॉक्स’मध्ये आयोजित केले होते. परंतु वारंवार विनंती आणि अर्ज करूनही आपल्या शेजारी कार्यक्रमांची दखल न घेण्याच्या आयोजक आणि संबंधितांच्या धोरणामुळे आवाजाच्या विचित्र पातळीचा त्रास आपल्या या नाटकाला नक्कीच होणार आहे. असमंजस आयोजकांपुढे केवळ नाइलाजाने आजचा आपला प्रयोग रद्द करावा लागत आहे. क्षमस्व”, अशी दिलगिरी कलाकारांनी व्यक्त केली आहे. (Sangeeet Matsyagandha Cancelled)

“अभिषेकी बुवांच्या स्मृतिदिनी ‘संगीत मत्यस्यगंधा’ या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागणे दुर्दैवी आहे. शेजारील कार्यक्रमांच्या संयोजकांना विनंती करूनही त्यांनी सहकार्य न केल्याने आमचाही नाईलाज झाला. रसिकांना आम्ही त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करणार आहोत”, असे कलाद्वयी संस्थेचे संजय गोसावी म्हणाले. (Sangeeet Matsyagandha Cancelled)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.