TVK Vijay Rally Stamepede ची केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली दखल; अभिनेता विजयचीही होणार चौकशी

TVK Vijay Rally Stamepede : गृहमंत्रालयाने घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला

190
Crowd at TVK Vijay Rally in Tamil Nadu
A massive crowd gathered at the TVK Vijay Rally in Tamil Nadu.

विजय थालापती (Vijay Thalapathy) यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) शनिवारी तमिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. (TVK Vijay Rally Stamepede) राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे.

शनिवारी संध्याकाळी तमिळनाडूतील करूर (Karur Tamil nadu) येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मते, या अपघातात १६ महिला आणि १० मुलांसह ३९ जणांचा मृत्यू झाला. ५१ जण आयसीयूमध्ये आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – TVK Vijay Rally Stamepede : ‘माझी मुलगी डोळ्यादेखत गेली’, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग)

तमिळनाडू पोलिसांच्या मते, विजयच्या रॅलीसाठी १०,००० लोकांची परवानगी देण्यात आली होती. पण १,२०,००० चौरस फूट परिसरात ५०,००० हून अधिक लोक जमले होते. अभिनेता सहा तास उशिरा पोहोचला. विजयला ९ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यांनी स्टेजवरून तिला शोधण्याचे आवाहन केले. ज्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रात्री उच्चस्तरीय बैठक घेतली आणि रात्री उशिरा करूर येथे पोहोचले. स्टॅलिन यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.

दरम्यान, गृहमंत्रालयाने घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघातानंतर अभिनेता विजय करूरहून थेट त्रिची विमानतळावर गेला आणि तेथून तो चेन्नईला रवाना झाला. त्याने X वर लिहिले की, “चेंगरीत झालेल्या मृत्यूंमुळे मी दु:खी झालो आहे. मला असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःख होत आहे.”

विजय यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या रुग्णांच्या प्रकृत्ती लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी टीव्हीकेचे करूर पश्चिम जिल्हा सचिव व्हीपी मथियाझगन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चार कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आता केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला. अमित शहा यांनी चेंगराचेंगरीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांच्याशी फोनवरून बोलून करूर येथील चेंगराचेंगरीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले. (TVK Vijay Rally Stamepede)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.