Underground Garbage Bins : मुंबईत साडेबारा लाखांची कचरा पेटी, कशी असेल ही कचरा पेटी, जाणून घ्या

शहर विभागातील चार प्रमुख महापालिका रुग्णलयांच्या आवारात मिळून एकूण १५ भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार आहे.

1998
Underground Garbage Bins : मुंबईत साडेबारा लाखांची कचरा पेटी, कशी असेल ही कचरा पेटी, जाणून घ्या
Underground Garbage Bins : मुंबईत साडेबारा लाखांची कचरा पेटी, कशी असेल ही कचरा पेटी, जाणून घ्या

महापालिका रुग्णालयात कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे तसेच त्या कचऱ्यापासून दुर्गंधी, रोगराई आणि उंदरांचा सुळसुळाट होऊ नये म्हणून आता या रूग्णालय पासिरात आधुनिक भुमिगत स्वरुपाचे कचऱ्याचे डबे बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या एका भूमिगत कचरा पेटीसाठी तब्बल साडेबारा लाख रुपये खर्च केला जाणार आहे. (Underground Garbage Bins)

मुंबई महापालिकेने शहर भागातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयात हे अत्याधुनिक स्वरूपाचे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार असून तब्बल १५ ठिकाणी या कचरा पेट्या बसवण्याचे नियोजन करत यासाठी निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या भूमिगत कचरा पेट्यांच्या बसवण्यासह त्यांची वार्षिक देखभाल करण्यासाठी मागवलेल्या या निविदेमध्ये पल्स सोलार सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. (Underground Garbage Bins)

१५ ठिकाणच्या कचरा पेट्यांवर ‘इतक्या’ लाखांचा खर्च

या कंपनीकडून एका भूमिगत कचरा पेटी ही १२ लाख ४९ हजार ४०० रुपयांना खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे १५ ठिकाणच्या कचरा पेट्यांसाठी एकूण १ कोटी ८७ ला ४१ हजार रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. शिवाय एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर पुढील दोन वर्षांच्या देखभालीसाठी यासर्व म्हणजे १५ ठिकाणच्या कचरा पेट्यांवर सुमारे १७ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Underground Garbage Bins)

शहर विभागातील चार प्रमुख महापालिका रुग्णलयांच्या आवारात मिळून एकूण १५ भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार आहे. यासर्वांचे जीपीआर सर्वे करण्यात आलेला आहे. त्यानुसार केईएम रुग्णालयात सहा ठिकाणी, शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात चार ठिकाणी, कस्तुरबा रुग्णालयात दोन ठिकाणी आणि शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात तीन ठिकाणी या भूमिगत कचरा पेट्या असतील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Underground Garbage Bins)

विद्यमान कॉम्पॅक्टरची सुधारणा

या भुमिगत कचरा पेट्यांमधील जमा झालेला हा कचरा कॉम्पॅक्टरमधून कचरा संकलन केंद्रावर वाहून नेत पुढे डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला जातो. त्यामुळे सध्या असलेल्या पाच कॉम्पॅक्टरची सुधारणा करण्यात येणार असून प्रत्येक कॉम्पॅक्टर १८ हजार याप्रमाणे तब्बल ९० हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या कॉम्पॅक्टरची सुधारणा करण्याचे कामही याच संबंधित कंत्राटदाराकडून करून घेतले जाणार आहे.

(हेही वाचा – Halal certification : हलाल प्रमाणपत्राविषयी महाराष्ट्र सरकारही गंभीर; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश)

मुंबईत अनेक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले. या सार्वजनिक ठिकाणच्या उघड्यावरील या कचऱ्याची आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच उघड्यावरील या कचरा पेट्यांमधील कचरा मोकाट जनावरे तसेच कचरा वेचकांमुळे बाहेर फेकला जातो. त्यामुळे कचरा पेटीचा परिसर अस्वच्छ होवून त्याठिकाणांहून चालतांना पादचाऱ्यांना तसेच नागरिकांना नाकाला रुमाल लावून चालावे लागते. त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीच्या भूमिगत कचरा पेट्या बसवल्यास कचऱ्याची दुर्गंधी, अस्वच्छता तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होईल या विचाराने महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ए, डी, पी/उत्तर व आर/मध्य या चार विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे आधुनिक भूमिगत स्वरुपाचे २.२ घनमीटर क्षमतेचे डबे बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते डबे बसवण्यातही आले आहेत. (Underground Garbage Bins)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका जनसंपर्क विभागाच्यावतीने माहिती पुस्तिका प्रसिध्द करण्यात येत असून या माहिती पुस्तिकेसंदर्भात बोलतांना महापालिका जनसंपर्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञा संदर्भातील मजकूर हा मागील दहा ते पंधरा वर्षांपासून याप्रकारच्या माहिती पुस्तिकेत छापला जात आहे. बाबासाहेबांवरील जीवनचरित्रासंदर्भात शासनाची मान्यता असलेल्या साहित्यातीलच हा मजकूर असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. हा मजकूर याच वर्षी प्रसिध्द केला जात नसून मागील अनेक वर्षांपासून प्रसिध्द केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Underground Garbage Bins)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.