Nair Hospital : नायर रुग्णालयात आता ‘ही’ चाचणी होणार मोफत

भारतात सध्या हृदयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे

155
Nair Hospital : नायर रुग्णालयात आता 'ही' चाचणी होणार मोफत
Nair Hospital : नायर रुग्णालयात आता 'ही' चाचणी होणार मोफत

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी खास ट्रोपोनिन चाचणी मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याची घोषणा नायर रुग्णालयाने केली. भारतात सध्या हृदयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हृदयरोगाच्या रुग्णांना आता पक्षाघाताचाही त्रास होऊ लागला आहे. यातून रुग्णांना मोठया वैद्यकीय खर्चाला सामोरे जावे लागत आहे. आता पालिकेतील नायर रुग्णालयात ट्रोपोनिन ही चाचणी मोफत उपलब्ध झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरु असून, महिन्याभरात ही चाचणी मोफत उपलब्ध होईल.

पालिकेच्या केईएम, सायन रुग्णालयांच्या तुलनेत नायर रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांची संख्या कमी असते. दर दिवसाला रुग्णालयात किमान अडीच हजार रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात. यात कान-नाक-घसा, मेडिसिन, प्रसूती तसेच रेडिओलॉजी विभागात रुग्णांची संख्या जास्त दिसून येते. सध्या हृदयरोगाचे रुग्ण वाढत असल्याने खासगी रुग्णालयाला मोठा आर्थिक फायदा होऊ लागला आहे. रुग्णाला छातीत दुखू लागल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याच्या भीतीने कित्येकदा रुग्णाचे कुटुंबीय खासगी रुग्णालयात दाखल करतात. त्यावेळी ट्रॉपोनिन ही चाचणीदेखील केली जाते.

(हेही वाचा – Mhada : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४,०८२ सदनिका विक्रीसाठी १४ ऑगस्टला संगणकीय सोडत)

खासगी रुग्णालये या चाचणी करिता अडीच हजार रुपये आकारतात. सामान्य रुग्णांना हा खर्च परवडत नाही. परिणामी, नायर रुग्णालयात ट्रॉपोनिन चाचणी थेट मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका आरोग्य प्रशासनाने घेतला. नायर रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, छातीत दुखणाऱ्या प्रत्येक रुग्णासाठी ट्रॉपोनिन चाचणी महत्वाची ठरते. जनरल मेडिसिन, एमआयसीयू, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभागातील रुग्णांची ही चाचणी डॉक्टर्स हमखास करतात. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना दाखल करून उपचार द्यावे लागतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.