Transfers : राज्यात मोठे प्रशासनिक फेरबदल! ५ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या; कोण कुठे? जाणून घ्या

316
Transfer : अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी डॉ. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती
  • प्रतिनिधी 

राज्य शासनाने आज मोठा प्रशासनिक फेरबदल करत तब्बल पाच आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे वाशिम, अकोला, परभणीसह महत्त्वाच्या जिल्ह्यांत आणि खात्यांत नवे अधिकारी रुजू होणार आहेत. (Transfers)

सर्वात चर्चेत असलेले बदल म्हणजे योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती आणि संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. या दोन्ही जिल्ह्यांत राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना नवे वळण मिळणार असल्याचे बोलले जाते. (Transfers)

(हेही वाचा – इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार B. Sudarshan Reddy अर्बन नक्षलवादी?)

मुंबईत महत्त्वाच्या पदावर म्हणजेच अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रकपदी आता रघुनाथ गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी क्षेत्राशी निगडीत महत्त्वाच्या निर्णयांसाठी जबाबदार असलेल्या महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भुवनेश्वरी एस. यांची नियुक्ती झाली आहे. (Transfers)

याशिवाय वर्षा मीना या अकोलाच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. विदर्भातील या जिल्ह्याला नवीन नेतृत्व मिळाल्याने स्थानिक पातळीवरही उत्सुकता आहे. (Transfers)

(हेही वाचा – Konkan rain : कोकणात पावसाचा जोर ओसरला; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर)

राज्य सरकारकडून वारंवार होणाऱ्या या प्रशासनिक फेरबदलांकडे राजकीय हालचालींच्या संदर्भातही पाहिले जात आहे. पुढील काही दिवसांत अजून काही मोठ्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश जाहीर होणार का? याची उत्कंठा आता अधिकच वाढली आहे. (Transfers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.