Train Accident : उत्तरप्रदेशमध्ये अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, 14 गाड्या रद्द

Train Accident : वृंदावन येथे मालगाडीचे 25 डबे रूळावरून घसरले

115
Train Accident : उत्तरप्रदेशमध्ये अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, 14 गाड्या रद्द
Train Accident : उत्तरप्रदेशमध्ये अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, 14 गाड्या रद्द

उत्तरप्रदेशच्या वृंदावन येथे बुधवारी रात्री झाशीहून सुंदरगडला जाणाऱ्या मालगाडीचे 25 डबे रूळावरून घसरले. गाडी वृंदावन-रोड स्थानकाच्या बाहेर पडत असताना हा अपघात झाला. त्यामुळे रेल्वे रूळांवर कोळसा पसरून वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातानंतर 14 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या 8 दिवसात मालगाडी रूळावरून घसरण्याची ही सातवी घटना आहे. (Train Accident)

(हेही वाचा- वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचे स्त्रोत आहेत- Mohan Bhagwat)

या अपघातानंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रेल्वे रूळावर पसरलेला कोळसा उचलण्याचे काम आज, गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होते. या अपघातानंतर 14 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 3 गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत. या रेल्वे अपघातात लाईन सप्लाय खांबही तुटले आहेत. रेल्वे रुळ दुरुस्त करण्यासाठी किमान 10-12 तास लागतील, असे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. परंतु, अपघातामुळे रेल्वेने 12059 (कोटा – हजरत निजामुद्दीन), 12060 (हजरत निजामुद्दीन – कोटा), 20452 (नवी दिल्ली – सोगारिया), 20451 (सोगरिया – नवी दिल्ली), 12050 (हजरत निजामुद्दीन – वीरांगना लक्ष्मीबाई झांसी), 12050 (हजरत निजामुद्दीन – वीरंगना लक्ष्मीबाई झांसी) , 12002 (नवी दिल्ली-राणी कमलापती), 12001 (राणी कमलापती-नवी दिल्ली), 20171 (राणी कमलापती-हजरत निजामुद्दीन), 20172 (हजरत निजामुद्दीन-राणी कमलापती), 22470 (हजरत निजामुद्दीन-कजुराहो-22470) – हजरत निजामुद्दीन), 11807 (वीरांगना लक्ष्मीबाई झाशी-आग्रा कॅन्टोन्मेंट), 11808 (आग्रा कॅन्टोन्मेंट-वीरांगना लक्ष्मीबाई झांसी) या गाड्या आज, गुरुवारी19 सप्टेंबर रोजी रद्द राहतील असे स्पष्ट केले आहे. (Train Accident)

रेल्वेकडून आरटीआयद्वारे प्राप्त माहितीनुसार, 7 जुलै 2021 ते 17 जून 2024 या कालावधीत देशात 131 रेल्वे अपघात झाले आहेत, त्यापैकी 92 रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटना आहेत. या अपघातांमध्ये 64 पॅसेंजर ट्रेन आणि 28 मालगाड्यांचा समावेश आहे, गेल्या तीन वर्षांत 2 पॅसेंजर ट्रेन आणि 1 मालगाडी रुळावरून घसरली आहे. परंतु, गेल्या 2 महिन्यांपासून देशभरात गाड्यांचे अपघात घडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मथुरा येथे घडलेली दुर्घटना हा अपघात की, घातपात…? अशी शंका निर्माण झाली आहे. (Train Accident)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.