Water : जलस्रोत राज्ये; ‘या’ ७ राज्यांमध्ये पाण्याची कमतरता कधीच नाही जाणवत

देशातील २२ टक्के जलस्रोत नैसर्गिक आहेत आणि ७८ टक्के म्हणजेच १८ लाख ९० हजार ४६० जलस्रोत हे मानवनिर्मित आहेत.

145

काही दिवसांपूर्वी मुंबईत पाणीकपात झाली होती. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नाही मिळालं तर किती मोठी समस्या उभी राहिल?. आता केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच जलस्रोतांची गणना केली आहे. यातून महत्वाची माहिती हाती आली आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, देशभरात २४ लाख २४ हजार २५० जलस्रोत आहेत. यामध्ये ९७ टक्के जलस्रोत ग्रामीण भागात आहेत. मात्र सहरांमध्ये ३ टक्क्यांहून कमी जलस्रोत आहेत. आता तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की कोणत्या राज्यात जास्त जलस्रोत आहेत. कोणतं राज्य भाग्यशाली आहे.

(हेही वाचा Maharashtra Politics Crisis : राहुल शेवाळे तातडीने वकिलांची फौज घेऊन दिल्लीला रवाना )

लक्षात घ्या देशातील २२ टक्के जलस्रोत नैसर्गिक आहेत आणि ७८ टक्के म्हणजेच १८ लाख ९० हजार ४६० जलस्रोत हे मानवनिर्मित आहेत. मात्र अर्ध्यापेक्षा अधिक जलस्रोतांवर खाजगी संस्थांचा अधिकार आहे. ४४.८० टक्के जलस्रोत सार्वजनिक संपत्ती असून यापैकी अधिक जलस्रोत पंचायतींच्या अंतर्गत आहेत.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्रोतांची गणना केली असून यातून ही महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे. पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम, तामिळनाडू, झारखंड, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या ७ राज्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे एका लाखापेक्षा जास्त जलस्रोत सापडले आहेत. दिल्ली, चंदीगढ, सिक्कीम, अरुणाचल मध्ये सर्वात कमी जलस्रोत आहेत. पश्चिम बंगालमध्ये साडे सात लाख, उत्तर प्रदेश मध्ये अडीच लाख जलस्रोत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.