Corona JN1 Virus : मुंबईत आतापर्यंत जेएन १चा एकही रुग्ण नाही

मुंबईत कोविड-१९ चे १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून दिवसभरात केलेल्या ५२ तपासणीमध्ये हे कोविडचे रुग्ण आढळून आले आहे. या पैंकी तीन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, मुंबईत कोरोना जेएन १च्या नव्या उपप्रकाराचा एकही रुग्ण आढळून नाही.

268
Corona JN1 Virus : मुंबईत आतापर्यंत जेएन १चा एकही रुग्ण नाही
Corona JN1 Virus : मुंबईत आतापर्यंत जेएन १चा एकही रुग्ण नाही

मुंबईत कोविड-१९ (Covid-19) चे १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून दिवसभरात केलेल्या ५२ तपासणीमध्ये हे कोविडचे रुग्ण आढळून आले आहे. या पैंकी तीन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, मुंबईत कोरोना जेएन १च्या (JN1) नव्या उपप्रकाराचा एकही रुग्ण आढळून नाही. या आजाराचे रुग्ण केवळ पाच  दिवसांमध्ये वैद्यकीय उपचारानंतर बरे होत असून कोरोनाच्या आजाराचे लक्षण आढळून आल्यानंतर त्वरीत महापालिकेच्या दवाखान्यात (Municipal Hospital) उपचार घेत तसेच यासाठीची आवश्यक काळजी घेत गर्दीत जाण्याचे टाळावे अशाप्रकारचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (Corona JN1 Virus)

मुंबईत डिसेंबर महिन्यात २५ डिसेंबरपर्यंत एकूण ७६ कोरोनाचे (Corona) अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर २५ डिसेंबर रोजी दिवसभरात १३ रुग्ण आढळून आले आहेत. या दिवसभरात एकूण ५२ तपासणी करण्यात आल्या असून या महिन्यात आतापर्यंत एकूण तपासण्यांची संख्या २५५२ एवढी झाली आहे. आयसीएमआरच्या (ICMR) मार्गदर्शक तत्वानुसार या संशयित रुग्णांच्या तपासण्या केल्या जातात. (Corona JN1 Virus)

(हेही वाचा – Thane Kasheli Bridge : ठाणे खाडीवरील कशेळी पुलाचे यासाठी होणार स्ट्रक्चरल ऑडीट)

तर दिवसभरात ३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या एकूण ९ रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. तर आतापर्यंत २२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र दिवसभरात तसेच आतापर्यंत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Corona JN1 Virus)

मात्र दिवसभरात आता आतापर्यंत जेएन १ (JN1) या उपप्रकाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नसून कोरोनाचे आढळून आलेल्या रुग्णांपैंकी ५५ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहे, तर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये सोम्य प्रकारची लक्षणे असून हे सर्व रुग्ण पाच दिवसांमध्ये पूर्णपणे बरे होतात, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो गर्दीतून प्रवास करताना मास्कचा वापर करावा तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. (Corona JN1 Virus)

(हेही वाचा – ST Breakfast Scheme : ३० रुपयांत नाष्ट्याची एसटीची योजना अडगळीत; प्रवाशांची लूट सुरुच)

कोरोनाची लक्षणे

ताप येणे, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, गंध न येणे. (Corona JN1 Virus)

काय घेणार काळजी

हात स्वच्छ धुवावे, खोकताना शिंकताना रुमालचा वापर करावा, नाक तोंड डोळ्यांना हात लावणे टाळावे, जर आपल्याला अशाप्रकारची लक्षणे दिसून आल्यास आपण स्वत:च गर्दीत मिसळणे टाळावे, मास्क लावणे, ताप, सर्दी खोकला आल्यास त्वरीत नजिकच्या दवाखान्यात जाऊन उपचार करणे. (Corona JN1 Virus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.