मुंबईच्या रस्त्यांवर आजही सुमारे ४००हून अधिक खड्डे

128

मागील काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून यामुळे रस्त्यांवरील खड्डयांनीही आपली तोंडे उघडल्याने रस्त्यांवरील खड्डयांची समस्या पून्हा एकदा निर्माण झाली आहे. आतापर्यंत मुंबईत २५ हजार ७५० खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. गणेशोत्सवाला दहा दिवस शिल्लक असतानाही मुंबईच्या रस्त्यांवर सुमारे ४०० ते ५०० खड्डे असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : Ganpati Festival Special train : कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! रेल्वे सोडणार ६ अतिरिक्त विशेष गाड्या )

मार्गावरील सुमारे ४०० ते ५०० खड्डे आजही कायम

गणेशोत्सव येत्या ३१ सप्टेंबरपासून साजरा होत असून श्री गणरायांच्या आगमन मार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी दिले असले तरी अनेक मार्गावर खड्डयांचे जाळे कायम आहे. बाप्पांच्या आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे प्राधान्य क्रमाने बुजवण्याचे काम सुरु असले तरी आजतागायत या मार्गावरील सुमारे ४०० ते ५०० खड्डे आजही कायम असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील २४ विभागांमध्ये कमीत कमी १० ते १५ आणि जास्तीत जास्त ५० खड्डे असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिका प्रशासनाचा दावा

मुंबईत १ एप्रिल २०२२ पासून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार आजवर महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून दिलेल्या कोल्डमिक्सद्वारे २१ हजार ५५० खड्डे बुजवण्यात आले आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी ३४ हजार ६६६ मेट्रीक टन कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. तर नेमलेल्या कंत्राटदारांच्या मदतीने २८९० खड्डे बुजवण्यात आले आहे. तर हमी कालावधीतील रस्त्यांवर पडलेले १३१० खड्डे बुजवण्यात आले असून अशाप्रकारे एकूण २५ हजार ७५० खड्डे आजवर बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.