Robot CEO Mika : ‘या’ कंपनीचा सीईओ आहे एक रोबो

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात काय बदल होतायत याचं एक क्रांतीकारी उदाहरण म्हणजे पोलंडमध्ये एका कंपनीने सीईओ पदावर एक रोबो बसवला आहे. या रोबोने एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्गला एक संदेशही दिला आहे. 

107
Robot CEO Mika : ‘या’ कंपनीचा सीईओ आहे एक रोबो
Robot CEO Mika : ‘या’ कंपनीचा सीईओ आहे एक रोबो
  • ऋजुता लुकतुके

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात काय बदल होतायत याचं एक क्रांतीकारी उदाहरण म्हणजे पोलंडमध्ये एका कंपनीने सीईओ पदावर एक रोबो बसवला आहे. या रोबोने एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्गला एक संदेशही दिला आहे. (Robot CEO Mika)

पोलंडमधील एक प्रसिद्ध बेव्हरेज कंपनी डिक्टेडोरने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर चक्क एक रोबोट बसवला आहे. आणि या रोबोचं नाव आहे मिका. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या महिलेचा चेहरा असलेल्या रोबो सीईओची नियुक्ती झाली. आणि त्यानंतर अलीकडेच तिने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. तेव्हापासून हा रोबो सीईओ चर्चेत आहे. (Robot CEO Mika)

‘मी आठवड्याचे सात दिवस चोवीस तास काम करते. मला आठवड्याची सुटी लागत नाही आणि मी सगळे प्रशासकीय निर्णय घेते. मी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची जादू आहे,’ असं मिकाने म्हटलं आहे. इतर सीईओंवर जी जबाबदारी असते, ती सर्व कामं मिका पार पाडते. मिका संभाव्य ग्राहकांची यादी बनवते, कंपनीच्या उत्पादनांसाठी डिझायनर शोधते, त्यांच्याकडून काम करून घेते. (Robot CEO Mika)

‘हे सगळे निर्णय मी डेटा ॲनालिसिसच्या मदतीने घेते आणि मी घेतलेल्या निर्णयात मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे मी जास्त पारदर्शकेतेनं हे निर्णय घेऊ शकते,’ असं मिकाने रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. एकदा कंपनीची आर्थिक उद्दिष्टं माहीत झाली की, त्यानुसार नियोजन करण्याचं काम मिका करते. (Robot CEO Mika)

मिकाकडे सर्व प्रकारच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या असल्या तरी लोकांना कामावर ठेवण्याचे किंवा काढून टाकण्याचे अधिकार मिकाकडे नाहीत. डिक्टेडोर कंपनीचे युरोपीयन विभाग प्रमुख मेरेक शोल्ड्रोवस्की यांनी मनुष्यबळ विकास विभाग रोबोंच्या हातात न सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Robot CEO Mika)

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरच्या तणावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रामबाण उपाय)

मिकाला खरंतर एक मोठी बहीणही आहे. सोफिया हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रोबो यापूर्वीच कार्यरत आहे आणि हे दोन्ही रोबो हॅनसन रोबोटिक्सने बनवले आहेत. मिका हे सोफियाचं अत्याधुनिक आणि जास्त सुरक्षित व्हर्जन असल्याचा कंपनीचा दावा आहे. (Robot CEO Mika)

एखाद्या कंपनीने सीईओ पदी रोबोची नियुक्ती केल्याचं हे एकमेव उदाहरण नाही. चीनमध्येही गेमिंग कंपन्यांनी असे प्रयोग पूर्वी केलेले आहेत. पण, या रोबोंच्या हातात सर्वाधिकार देण्यात येत नाहीत. (Robot CEO Mika)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.