Malad Railway Station : मालाड रेल्वे स्थानक परिसरातील तुंबणाऱ्या पाण्याचे दिवस सरले

मालाड पूर्व भागात रेल्वे लाईनच्या परिसरात पावसाळ्या तुंबणाऱ्या पाण्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या स्थानकाच्या आसपास रेल्वे प्रवाशांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

32
Malad Railway Station : मालाड रेल्वे स्थानक परिसरातील तुंबणाऱ्या पाण्याचे दिवस सरले
Malad Railway Station : मालाड रेल्वे स्थानक परिसरातील तुंबणाऱ्या पाण्याचे दिवस सरले

मालाड पूर्व भागात रेल्वे लाईनच्या परिसरात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या स्थानकाच्या आसपास रेल्वे प्रवाशांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे रेल्वे स्थानक परिसर तसेच रेल्वे लाईन मार्गावर तुंबणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या पुरपरिस्थितीतून नागरिकांना दिलासा म्हणून महापालिकेने आता रेल्वे मार्गातील कल्व्हर्टची रुंदी वाढवून याला जोडणाऱ्या मार्गावरील पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून पुढील पावसाळ्यापूर्वी या कामाला सुरुवात होणार आहे. (Malad Railway Station)

महापालिकेच्या पी/उत्तर विभागातील मालाड (पूर्व) रेल्वे कॉलनी येथील राणी सती मार्ग ते कल्व्हर्ट नं. ५४ या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा निवेतिया रोड परिसर हा रेल्वे सीमा लगत आहे. हा परिसर सखल असल्याने काही वर्षापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात या भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होते. हे ठिकाण रेल्वे सीमा लगत असल्याने पावसाळयात रेल्वे रुळांवरही पाणी येत असल्याने रेल्वे प्राधिकरणामार्फत महापालिकेकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या विभागातील अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रेल्वेचे संबंधित अधिकारी यांचे सोबत संयुक्त स्थळ पाहणी केली. त्यात या ठिकाणी जुन्या व अपुऱ्या क्षमतेच्या व काही ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या पर्जन्य जलवाहिन्या व काही भागांमध्ये पर्जन्य जलवाहिन्यांचा उतार योग्य नसल्याने आसपासच्या परिसरात व रेल्वे मार्ग परिसरात नेहमीच पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. (Malad Railway Station)

त्यानुसार महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या निविदा मागवून या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. या निविदेमध्ये यासाठी २.८२ कोटी रुपये खर्च केले जाणार असून या कामांसाठी पी. एच. ब्रदर्स ही कंपनी पात्र ठरली आहे. या सुधारणा करण्यात येणाऱ्या नाल्याची लांबी ३५० मीटर एवढी आहे. हे काम सिमेंट काँक्रिटचे केले जाणार आहे. मार्च २०२३ महिन्यात निविदा काढल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात या पात्र कंपनीच्या कंत्राट कामाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे यापूर्वीच हा प्रस्ताव सादर करून याला मंजुरी दिली गेली असती तर कंत्राटदाराला आधीच कार्यादेश देत प्रत्यक्षात हे काम ऑक्टोबरच्या पहिलया आठवड्यातच सुरु करता आले असते. त्यामुळे मार्च महिन्यांमध्ये निविदा अंतिम केल्यानंतर प्रत्यक्षात याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासनाला महापालिका अस्तित्वात नसतानाही सात महिन्यांचा कालावधी लागत असल्याने नक्की या प्रस्ताव मंजुरीच्या फाईलीचा कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलावर जास्त काळ वास्तव्य होते, हा आता संशोधनाचा भाग ठरला आहे. (Malad Railway Station)

(हेही वाचा – Online Food Delivery : शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहारी जेवणाची आली डिलिव्हरी, ठोठावला दंड , जाणुन घ्या कोणत्या आहेत कंपन्या)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालाडमधील स्थानिक तत्कालिन नगरसेविका दक्षा पटेल व आमदार अतुल भातखळकर यांनी या परिसरातील रहिवाश्यांना पावसाळी पाण्यापासून व पुरसदृष्य स्थितीपासून दिलासा मिळविण्याकरिता वारंवार पत्र व्यवहार व पाठपुरावा केला होता. तसेच त्यामुळे मालाड (पूर्व) येथील राणी सती मार्गाजवळील शगुन बिल्डींग ते निवेतिया बंगला व पुढे कल्व्हर्ट नं. ५४ पर्यंत, पर्जन्य जलवाहिन्यांचे सुधारणा व बांधकाम करणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाळयात पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन आजूबाजूच्या भागात व रेल्वे प्राधिकरणाच्या आवारात पाणी साचण्याच्या प्रकारास आळा बसेल, त्यामुळे या पर्जन्य जलवाहिनींची सुधारणा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार या कामांसाठी निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Malad Railway Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.