The Kerala Story : अमरावतीत कोणतेही विरोध, निदर्शने नाहीत, पोलिस बंदोबस्तात ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित

'द केरला स्टोरी'ला (The Kerala Story) पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

212
The Kerala Story
The Kerala Story : अमरावतीत कोणतेही विरोध, निदर्शने नाहीत, पोलिस बंदोबस्तात 'द केरळ स्टोरी' प्रदर्शित

लव्ह जिहाद वर आधारीत द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट शुक्रवार ५ मे रोजी प्रदर्शित झाला. अमरावती शहरातील तिन चित्रपटगृहात पोलिस बंदोबस्तात चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. राजापेठ पोलिसांनी ई आर्बिट व तापडिया मॉलच्या मिराज थिएटरमध्ये ५ ते ६ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवला. तसेच राजकमल चौक येथील राजलक्ष्मी थिएटर वर द केरळ स्टोरी करिता पहिल्या शो पासून शेवटच्या शोपर्यंत ५ ते ६ कोतवाली ठाण्याचे पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात होते.

(हेही वाचा –

पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

‘द केरळ स्टोरी’ला (The Kerala Story) पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लव्ह जिहादवर बनलेल्या या चित्रपटात केरळच्या महिलांना जबरदस्तीने धर्मांतरण करणे व आईएसआईएसमध्ये सहभागी करण्याची कहानी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुदिप्तो सेन दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हापासूनच चित्रपटाला विरोध सुरु झाला. हा विरोध पाहता, देशभरात शुक्रवारी द केरला स्टोरीच्या रिलीजवर सर्व चित्रपटगृहांमध्ये खबरदारी म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. अमरावती शहरातील तिन थिएटरांमध्ये कोणतेही विरोध, निदर्शने झाली नाहीत.

७० मातृशक्तीनी पाहिला चित्रपट

भाजपाच्या माजी नगरसेविका आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेखा लुंगारे यांच्यासोबत ७० मातृशक्तीने (The Kerala Story) द केरला स्टोरी चित्रपट पाहिला. दुपारी १२ वाजेच्या शोला पोहचून भाजपा, दुर्गावाहिनी आणि विवीध हिंदू संघटनांच्या महिलांनी हा चित्रपट पाहिला. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट पाहून अंगावर शहारे येतात. समाजात हे काय सुरु आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येक मुलीने आपल्या परिवारासह हा चित्रपट (The Kerala Story) पाहणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थीतीत न घाबरता, सामना करणे आणि निर्णय घेण्याची क्षमता असली पाहीजे, याची शिकवण या चित्रपटामधून मिळते. सुरेखा लुंगारे यांनी सर्व महिलांना, आणि तरुणींना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. चित्रपट पाहण्यासाठी सुरेखा लुंगारे यांच्यासोबत अनुराधा पांडे, जान्हवी पानट, रश्मी गांधी, ऋषिका पिंगळे, रेणुका जोशी, इंद्राणी बपोरिकर, अनुभूती टवलारे, प्राची पालकर आदी उपस्थित होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.