तुम्ही गाडी कशी चालवता, यावर ठरणार विमा हफ्ता

136

आपण गाडी कशी आणि किती वेळ चालवतो त्यानुसार आता विम्याचा हप्ता ठरणार आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने ‘पे अॅज यू ड्राइव्ह’ यांसारख्या टेलिमॅटिक्सवर आधारित मोटार वाहन विमा संरक्षणास मंजुरी दिली आहे. यामुळे एकाच पाॅलिसीत बाईक्स आणि कार यांना विमा संरक्षण मिळू शकणार आहे.

( हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची महती सांगणारे संग्रहालय मुंबईत उभारणार- विधानसभा अध्यक्ष )

नवीन बदल काय?

  • सामान्य विमा कंपन्यांच्या प्रचलित मोटर ओन डॅमेज कवचाला तंत्रज्ञान-सक्षम पूरकतेची जोड
  • जितके वाहन चालवले जाईल आणि वाहनधारकाच्या वाहन-चालनाच्या वर्तनावर आधारित विम्याचा दर ठरवला जाणार
  • एकाच्याच मालकीची दुचाकी व कार असेल, तर अशा ग्राहकाला दोन्ही वाहनांसाठी फ्लोटर पाॅलिसी तुलनेने सवलतीच्या दरात मिळणार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.