जागतिक संघटनेकडून भविष्यात सर्वाधिक तापमानाचा इशारा

वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी दूरगामी परिणाम" होण्याची भीती

88

वाढत्या प्रदूषणाचा हवामानावर गंभीर परिणाम होत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार २०१५ ते २०२१ हा कालावधी रेकॉर्डवरील सर्वाधिक उष्ण वर्ष आहेत. हवामान संघटनेला आढळून आले की, २०२१ चे सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा सुमारे १.०९ अंश सेल्सिअस जास्त होते. म्हणूनच COP26 हवामान परिषद सुरू होताच, WMO हवामान अहवालाच्या प्राथमिक स्थितीत म्हटले आहे की, हरितगृह वायू उत्सर्जनामुळे होणाऱ्या जागतिक तापमानवाढीमुळे “वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी दूरगामी परिणाम” होण्याची भीती आहे.

पर्यावरण धोक्यात

महासागराच्या खोलीपासून ते पर्वताच्या शिखरापर्यंत, हिमनद्या वितळण्यापासून ते हवामान बदलांच्या घटनांपर्यंत, जगभरातील पर्यावरण आणि समुदाय उद्ध्वस्त होत आहेत,” असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अहवालावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर, हा अहवाल धक्कादायक आणि गंभीर असून अस्वस्थ करणारा आहे आणि जागतिक नेत्यांना आणखी एक वेक-अप कॉल आहे की चर्चेची वेळ संपली आहे. असे, ब्रिस्टल ग्लेशियोलॉजी सेंटरचे संचालक जोनाथन बांबर यांनी सायन्स मीडिया सेंटरसमोर स्पष्ट केले.

(हेही वाचा- एकेकाळी ‘मातोश्री’साठी विश्वासू बनलेले नीरज गुंडे आहेत तरी कोण?)

२० वर्षातील सर्वाधिक तापमान

मानवाने औद्योगिक स्तरावर जीवाश्म इंधने जाळण्यास सुरुवात केल्यामुळे गेल्या २० वर्षांतील सरासरी तापमान (२००२-२०२१) वाढले आहे. यामुळे दैनंदिन जीवनावर व्यापक परिणाम होणार आहे त्यामुळे हवामान विघटन मर्यादित करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र आणि राज्याने सखोल आणि व्यापक कृती करणे आवश्यक आहे. असे हवामान तज्ज्ञांनी सूचित केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.