रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड   

पालघर येथून आरोपीच्या घरातून 1 लाख 89 हजार रुपये किमतीचे 63 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले.

67

के.के. वाघ कॉलेजजवळ रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या टोळीतील आणखी एकास आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 63 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.

नाशिकमधील 4 संशयितांना अटक केली!

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी आडगाव पोलिसांनी नाशिकमधील 4 संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून 2 रेमडेसिवीरचे इंजेक्शन ताब्यात घेतले होते. या संशयितांकडे अधिक तपास केला असता नाशिक व पालघर जिल्ह्यातून आणखी 4 संशयितांना अटक केली. त्यामध्ये रोहित मुठाळ (रा. नाशिक), महेश पाटील (रा.वसई), अभिषेक शेलार (रा. वाडा) व सुनील गुप्ता (रा. विरार) यांना अटक करून त्यांच्याकडून आणखी 20 इंजेक्शन जप्त केले.

ही कारवाई पोलिस आयुक्त दीपक पांडेय, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त सीताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
– आयुक्त अमोल तांबे

(हेही वाचा : म्युकरमायकोसिसचे दिवसाला २०० रुग्ण वाढतात! राजेश टोपे यांची माहिती )

63 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले!

या टोळीकडे पोलिसांनी बारकाईने चौकशी केली असता त्यांचा 1 साथीदार पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे राहणारा सिद्धेश अरुण पाटील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यास पालघर येथे जाऊन ताब्यात घेतले असता त्याच्या घरातून 1 लाख 89 हजार रुपये किमतीचे 63 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या 63 रेमडेसिवीर इंजेक्शन पैकी 62 इंजेक्शन कंपनीचे लेबल नसलेले व 1 कंपनीचे लेबल असलेल्या इंजेक्शनचा समावेश होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सिद्धेश पाटील हा रेमडेसिवीर इंजेक्शन बनविणाऱ्या एका कंपनीत कामास असून त्याने वेळोवेळी हे इंजेक्शन कंपनीतून चोरल्याची माहिती तपासात निष्पन्न झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.