Marol Military Road : मिलिटरी रोडसह मरोळ भागांतील तुंबणाऱ्या पाण्यावर सापडला उतारा

या सर्व नाल्यांमधील रुंदीकरणासह नवीन बांधकामासाठी विविध करांसह सुमारे ११ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

93
Marol Military Road : मिलिटरी रोडसह मरोळ भागांतील तुंबणाऱ्या पाण्यावर सापडला उतारा
Marol Military Road : मिलिटरी रोडसह मरोळ भागांतील तुंबणाऱ्या पाण्यावर सापडला उतारा

अंधेरी पूर्व येथील मिलिटरी रोडसह हसनपाडा रोड आणि मरोळ परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असल्याने यावर प्रतिबंधक उपाय म्हणून याठिकाणच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. यासाठी या भागातील सर्व पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण तसेच नव्याने बांधकाम हाती घेण्यात येत आहे. या सर्व नाल्यांमधील रुंदीकरणासह नवीन बांधकामासाठी विविध करांसह सुमारे ११ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. (Marol Military Road)

पावसाळ्यात पाण्याचा योग्य रितीने निचरा करण्यासाठी मिलिटरी रोड, हसनपाडा रोड, एम. सी. छगला रोड व मरोळ भंडार याठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण तसेच बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे काम हाती घेण्यासाठी महापालिकेने मार्च २०२३मध्ये निविदा मागवली होती. या निविदेमध्ये स्पार्क सिव्हील इन्फ्राप्रोजेक्ट ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी विविध करांसह ११ कोटी २९ लाख ७० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. हे काम पावसाळा वगळता एक वर्षांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे. (Marol Military Road)

(हेही वाचा – IND VS PAK : बाबर आझमने दिले आव्हान; अहमदाबादमध्ये तापले वातावरण)

या कामांसाठी मार्च २०२३मध्ये निविदा मागवण्यात आली होती. परंतु या निविदेत पात्र ठरलेल्या कंपनीच्या कंत्राट कामाला प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात मंजुरी दिली गेली. विशेष म्हणजे या कामाला मार्च महिन्यांमध्ये पात्र कंपनीची निवड झाल्यानंतर यापूर्वीच मंजुरी मिळणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर या कंपनीला कार्यादेश देऊन प्रत्यक्षात या कामांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली असती. पण आता या कामाला ऑक्टोबरमध्ये मंजुरी दिल्यामुळे प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे या कामाचा एक महिन्याचा अवधी कमी होत असून पर्जन्य जलवाहिन्यांच्या अधिकाऱ्यांनी योग्यप्रकारे नियोजन केल्यानंतरही हा प्रस्ताव अडवून ठेवला होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Marol Military Road)

अंधेरी पूर्व विभागातील मिलिटरी रोड, हसनपाडा रोड, एस सी छगला रोड व मरोळ भांडार येथील भागातील पर्जन्य जलवाहिन्यांची रुंदी पुरेशी नसून काही ठिकाणी या पर्जन्य जलवाहिन्या मोडकळीस आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होते. परिणामी पावसाचे पाणी साचून स्थानिकांच्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा केला जात असल्याने महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने हे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. (Marol Military Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.