IND VS PAK : बाबर आझमने दिले आव्हान; अहमदाबादमध्ये तापले वातावरण

120

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्व चषकातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित भारत विरोधात पाकिस्तान यांच्यातील सामना (IND VS PAK) शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या आधीच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताच्या विरोधात आव्हानाची भाषा केली. आम्ही भारताला पराभूत करू, असे बाबर आझमने म्हटले आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे.

टी 20 विश्वचषक 2021 मध्ये आम्ही भारताचा पराभव केला होता. आताही भारताला हरवू शकतो. भूतकाळात काय झाले, हे महत्वाचे नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आम्ही एक टीम म्हणून सर्वश्रेष्ठ कामगिरी करणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. या परिस्थितीत गोलंदाजाकडून चूक होण्याची शक्यता कमीच आहे. अनुभव तुम्हाला अधिक चांगले होण्यास मदत करतो. 2021 च्या टी 20 विश्वचषकात आम्ही भारताचा पराभव केला आहे. मला वाटतेय की, आताही आम्ही असेच करु शकतो, असेही आझम म्हणाला.

(हेही वाचा Bombay High Court : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला झापले; तर उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला नाकारले )

आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम याला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सामन्यात बाबर आझम याला फक्त 15 धावा करता आल्या आहेत. त्याबाबत बोलताना बाबर म्हणाला की, ‘विश्वचषकात आतापर्यंत माझ्या बॅटमधून जास्त धावा निघाल्या नाहीत. यामध्ये बदल होईल, अशी मला अपेक्षा आहे. जर तुम्हाला विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल तर फिल्डिंग चांगली असायला हवी. आम्ही त्यावर काम करत आहोत. माझ्या मते चाहत्यासमोर शानदार कामगिरी करण्याची संधी आहे. त्यानुसार, आम्ही प्लॅन तयार करणार आहोत. कारण, पहिल्या 10 षटकावेळी विकेट वेगळी असेल. त्यानंतरची विकेट वेगळी असेल. आम्हाला नसीम शाह याची कमतरता जाणवत आहे. शाहीन आफ्रिदीने आमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्यावर आमचा विश्वास आहे. तो स्वत:वरही विश्वास करतो. भारताविरोधातील सामन्यात आमच्यावर कोणताही दबाव नाही. हैदराबादमध्ये आम्हाला खूप सपोर्ट मिळाला होता. अहमदाबादमध्येही आम्हाला चाहत्यांचा सपोर्ट मिळेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.