Naina Project Panvel : शेतकरी विरोधी नैना प्रकल्प रद्द झालाच पाहिजे; अंबादास दानवेंनी केली मागणी

शेतकऱ्यांकडून प्रकल्पासाठी ६० टक्के जमीन व ४० टक्के जमीन शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

168
Naina Project Panvel : शेतकरी विरोधी नैना प्रकल्प रद्द झालाच पाहिजे; अंबादास दानवेंनी केली मागणी
Naina Project Panvel : शेतकरी विरोधी नैना प्रकल्प रद्द झालाच पाहिजे; अंबादास दानवेंनी केली मागणी

नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येत असलेला नैना प्रकल्प हा आधुनिक भांडवल दारीचा असून काही अधिकाऱ्यांना पोसणारा, काही दलाल व बिल्डर्सच्या फायद्यासाठी व त्यांची खळगी भरण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गुरूवारी (१४ डिसेंबर) विधान परिषदेत बोलताना केला. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने हा प्रकल्पच तातडीने रद्द करावा, अशी मागणीही दानवे यांनी यावेळी केली. (Naina Project Panvel)

अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित झालेल्या मुद्द्याद्वारे बोलताना दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, आपण स्वतः नैना प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून प्रकल्पबाधितांशी भेट घेऊन चर्चा केली. सरकारच्या माध्यमातून २०१३ पासून या योजनेच नियोजन सुरू आहे. मात्र ही योजना स्थानिक भूमिपुत्र व विशेषतः शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला. (Naina Project Panvel)

नैना प्रकल्प बधितांना वेगळा एफएसआय लागू

शेतकऱ्यांकडून प्रकल्पासाठी ६० टक्के जमीन व ४० टक्के जमीन शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. जमिनीचा मालकी हक्क असतानाही शेतकऱ्यांना त्याच ठिकाणी जमीन न देता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी ४० टक्के जमीन दिली जाणार आहे. नैना प्रकल्प (Naina Project) बधितांना वेगळा एफएसआय (FSI) लागू करून त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय केला जात असल्याचे दानवे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. खरंतर या योजनेत दलाल मोठ्या प्रमाणात घुसले आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात बिल्डर्स शेतकऱ्यांची जमीन लाटत असून आजच्या घडीला त्याठिकाणी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे सरकारला नैना प्रकल्प (Naina Project) राबवायचा असेल तर १०० टक्के भूसंपादन करून योग्य तो मोबदला प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिला पाहिजे, अशी भूमिकाही दानवे (Ambadas Danve) यांनी मांडली. (Naina Project Panvel)

(हेही वाचा – Online Gaming : लवकरच ‘डेटा शेअरींग’विषयी कायदा करणार; देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन)

शेतकऱ्यांना प्राथमिकता ठेवली पाहिजे

या प्रकल्पाच्या ठिकाणी वेगळे नियम, वेगळं बंधन सरकार लावतयं. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आधी ड्रॉ काढण्यात यावा, शेतकऱ्यांना प्राथमिकता ठेवली पाहिजे, अशी सूचना करत या प्रकल्पात आधुनिक भांडवलदारी सरकार करू पाहत की काय अशी शंकाही दानवे (Ambadas Danve) यांनी व्यक्त केली. हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे ही जनतेची भूमिका आहे. शेतकऱ्यांना आर्थिक विंवचनेच्या दरीत लोटणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ११० अधिकारी नेमले गेले. दोनशे लोकांनी तेथे परवानग्या मागितल्या. येथे अधिकारी आराम करण्यासाठी व खळगी भरण्यासाठी काही दलालांना पोसण्यासाठी येत असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेते दानवे (Ambadas Danve) यांनी यावेळी बोलताना केला. (Naina Project Panvel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.