Online Gaming : लवकरच ‘डेटा शेअरींग’विषयी कायदा करणार; देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन

‘ऑनलाईन गेमिंग’विषयी (Online Gaming) केंद्रशासनाने कायदा केला नाही, तर महाराष्ट्र यासाठी स्वतंत्र कायदा करेल; परंतु केंद्रशासनाचा कायदा येईपर्यंत आपण वाट पाहू, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे चालणारा जुगार रोखण्यासाठी विधानसभेत चर्चा चालू असतांना ते बोलत होते.

189
Online Gaming : लवकरच ‘डेटा शेअरींग’विषयी कायदा करणार; देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन
Online Gaming : लवकरच ‘डेटा शेअरींग’विषयी कायदा करणार; देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन

वॉट्सअप, टेलिग्राम आदी ‘ॲप’द्वारे जुगार खेळला जातो तेव्हा ‘ॲप’मध्ये शिरून कारवाईस मर्यादा येते. (Online Gaming) याविषयीच्या तक्रारी केंद्रशासनाकडेही प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा’ उपलब्ध झाल्यास अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणता येईल. त्यामुळे सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा शेअरींग’साठी (Law on ‘Data Sharing’) केंद्रशासन कायदा करण्याच्या विचारात आहे. लवकरच याविषयीचा कायदा येईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. एका लक्षवेधी सूचनेवर आमदार बच्चू कडू यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’वर (Online Gaming) बंदी घालण्याची मागणी सभागृहात केली. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वरील माहिती दिली.

(हेही वाचा – Online Fraud : जवळपास तीन वर्षांपासून हॉटेल बंद, मात्र तरीही बुकिंग सुरूच …)

केंद्रशासनाचा कायदा येईपर्यंत वाट पहाणार

या कंपन्यांचे दक्षिण अमेरिकेत रजिस्ट्रेशन केले जाते. दुबई (Dubai) येथून ही यंत्रणा चालवली जाते. त्यामुळे ‘ऑनलाईन गेमिंग’वर (Online Gaming) बंदी घालण्यासाठी केंद्रशासनाला कायदा करावा लागेल. जो जुगार आपण प्रत्यक्ष बंद केला तो ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू आहे. ‘इन्स्टाग्राम’ सारख्या सामाजिक माध्यमांवर जुगार खेळण्यासाठी संदेश पाठवला जातो.

हा संदेश पाठवण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याद्वारे ‘गुगल पे’ द्वारे पैसे घेतले जातात. त्यानंतर ‘कुरिअर’द्वारे पार्सल दिले जाते. अशा नवनवीन पद्धतींचा उपयोग केला जातो. ‘ऑनलाईन गेमिंग’विषयी (Online Gaming) केंद्रशासनाने कायदा केला नाही, तर महाराष्ट्र यासाठी स्वतंत्र कायदा करेल; परंतु केंद्रशासनाचा कायदा येईपर्यंत आपण वाट पाहू.’’

(हेही वाचा – Rohit Sharma on World Cup Defeat : ‘लोकांच्या प्रेमामुळे धक्क्यातून सावरु शकलो’)

सायबर गुन्ह्यांविरोधात ५-६ मासांत तरुण पोलिसांचा गट सिद्ध करणार !

ऑनलाईन आर्थिक फसवणूक (Online Financial Fraud) झाल्यावर पैसे ५-६ अधिकोषांमध्ये फिरून विदेशात पाठवले जातात. त्यामुळे हा पैसा पुन्हा मिळवता येत नाही. हळूहळू प्रत्यक्ष होणारे आर्थिक गुन्हे अल्प होऊन घरी राहून ऑनलाईन गुन्हे वाढत आहे. सायबर गुन्हे (Cyber Crime) रोखण्यासाठी महाराष्ट्र शीघ्रगतीने कारवाई करणारी यंत्रणा सिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये जगातील १७ प्रथितयश आस्थापना सहभागी होत आहेत. यामध्ये सर्व प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. यामध्ये बँक, सामाजिक प्रसारमाध्यमे यांचे प्रतिनिधीही सहभागी असतील. एप्रिल-मेपर्यंत ही यंत्रणा सिद्ध करण्यात येईल. ही यंत्रणा सायबर गुन्ह्यांशी लढा देईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात सांगितले.

प्रसिद्ध व्यक्तींनी पैशासाठी ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन करणे चुकीचे

केवळ पैसे मिळतात म्हणून प्रसिद्ध व्यक्तींनी ‘ऑनलाईन गेमिंग’ची (Online Gaming) विज्ञापने करू नयेत. यांमुळे जुगाराची सवय लागते. प्रसिद्ध व्यक्तींनी अशा प्रकारची विज्ञापने करू नयेत, यासाठी मी त्यांना विनंती करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

(हेही वाचा – Online Fraud : जवळपास तीन वर्षांपासून हॉटेल बंद, मात्र तरीही बुकिंग सुरूच …)

‘डेटा’ देवाणघेवाण करण्याविषयी संयुक्त राष्ट्र संघातही चर्चा

‘डेटा इज न्यू ऑईल’ असे म्हटले जाते. माहितीने तेलाच्या किमतीलाही मागे टाकले आहे. ज्याच्याकडे ‘डेटा’ आहे, तोच जगावर राज्य करू शकतो. स्वत:च्या माहितीवर स्वत:चा अधिकार रहावा, याविषयी जगातील विविध देशांमध्ये काम चालू आहे. ‘डेटा’ची देवाणघेवाण होण्याविषयी संयुक्त राष्ट्र संघातही चर्चा चालू आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (Online Gaming)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.