दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्लाचा कट उघड

93

जुनैद आणि त्यांच्या साथीदारांचा आत्मघातकी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे, दिल्ली आणि युपीतील तीन प्रमुख लोकांवर हल्ला करणार होते, जुनैदला पुण्यातून अटक करण्यात आली होती. नरसिंह सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण या तिघांवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची होणाऱ्या रॅलीवरही हल्ला करण्याचा कट होता. पुण्यातील दापोडी भागातून जुनैदला ताब्यात घेण्यात आले.

जुनैदची १७ फेसबुक अकाउंट 

हल्ल्याच्या स्फोटके बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाकिस्तानातून येणार होते. जुनैद हा सोशल मीडियामध्ये सक्रिय होता, १७ हुन अधिक अकाउंट हे फेसबुकमध्ये होते. सोशल अकाउंट होते. काश्मीरमधील अतिरेकी संघटनांनी जुनैदला पैसा पुरवल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून जुनैद महंमद महंमदच्या साथीदाराला काश्मीर येथे अटक केली होती. आफताब हुसैन शाह (वय २८, रा. किश्‍तवार, जम्मू आणि काश्मीर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो जुनैद आणि लष्कर ए तैयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. जुनैदला मे महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली होती. या तपास पथकाने श्रीनगरपासून २९१ किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्‍तवार या ठिकाणी आफताबला ताब्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.