Teachers Dress Code : शिक्षकांची ड्रेस कोड संहिता रद्द करावी; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

१५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेला अन्यायकारक संच मान्यतेचा शासन निर्णय दुरुस्त करावा व ड्रेस कोड बाबतचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी सर्व राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

115
Teachers Dress Code : शिक्षकांची ड्रेस कोड संहिता रद्द करावी; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

शिक्षण व्यवस्थेतील अन्यायकारक संच मान्यतेचा शासन निर्णय दुरुस्त करावा व ड्रेस कोड (Teachers Dress Code) बाबतचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिर्लेकर,कार्यवाह शिवनाथ दराडे,कोषाध्यक्ष गणेश नाकती यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना दिले असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. (Teachers Dress Code)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या नितिन गडकरी विरुद्ध कोण ?)

जुन्या संच मान्यते च्या निकषांमध्ये ही दुरुस्ती करणे आवश्यक :

गेल्या १५ मार्च २०२४ रोजी विद्यार्थी व शिक्षकांचे प्रमाण निश्चित करणारा संच मान्यतेचा नवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. तसेच विशेष शिक्षकांविषयी तरतुदीवरही शिक्षकांनी आक्षेप घेतलेले आहेत. शिक्षक परिषदच्या वतीने जुन्या संच मान्यतेच्या निकषांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आलेली आहेत. जुन्या संच मान्यते च्या निकषांमध्ये ही दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Teachers Dress Code)

(हेही वाचा – S. Jaishankar : अरुणाचलवरील चीनचा दावा हा हास्यास्पद)

ड्रेस कोड संहिता म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा :

तसेच शिक्षकांना ड्रेस कोड संहिता (Teachers Dress Code) लावणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा पोहोचवणारी गोष्ट आहे. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पेहराव सर्वत्रच योग्य पद्धतीने आहे. शिक्षकांच्या पेहरावाच्या तक्रारी आलेल्या नाहीत. त्यामुळे ड्रेस कोड बाबत सक्ती करू नये, असे निवेदनात म्हंटले आहे. १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेला अन्यायकारक संच मान्यतेचा शासन निर्णय दुरुस्त करावा व ड्रेस कोड (Teachers Dress Code) बाबतचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी सर्व राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.