Mumbai city tata power supply : टाटा पॉवर मुंबई शहरात अधिक होते मजबूत, उच्च क्षमतेच्या केबल्स टाकण्याचे काम जोरात सुरू

सध्या माहिम ते परळ दरम्यान टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून विजेच्या केबल्स टाकल्या जात आहेत.

1825
Mumbai city tata power supply : टाटा पॉवर मुंबई शहरात अधिक होते मजबूत, उच्च क्षमतेच्या केबल्स टाकण्याचे काम जोरात सुरू
Mumbai city tata power supply : टाटा पॉवर मुंबई शहरात अधिक होते मजबूत, उच्च क्षमतेच्या केबल्स टाकण्याचे काम जोरात सुरू
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईत सध्या जुन्या इमारतींसह गिरण्यांचा जागेचा पुनर्विकास होत असून या नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये आता टाटाने वीज वितरणाचे जाळे अधिक वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई शहरांमध्ये बेस्ट उपक्रमासोबतच टाटा पॉवर कंपनीही वीज वितरण करत असून भविष्यात मुंबई शहरांमध्ये अधिकाधिक वीज वितरणाचा भार पेलण्यासाठी आता शहर भागांमध्ये उच्च दाबाच्या तारखंड अर्थात केबल्स टाकण्याचे काम जोरात सुरू आहे.(Mumbai city tata power supply)

मुंबई शहरांमध्ये बेस्ट उपक्रम आणि टाटाच्या माध्यमातून वीज वितरण केले जात असून उपनगरांमध्ये पूर्वी रिलायन्स एनर्जी आणि आता अदानी इलेक्ट्रीक कंपनीच्या माध्यमातून विजेचा पुरवठा केला जात आहे. मुंबई शहरांमध्ये टाटा कंपनीकडून वीज खरेदी करून बेस्ट उपक्रम वितरण करत असून बेस्टला वितरण करण्याचा परवाना असल्याने विजेची निर्मिती करणाऱ्या टाटावरच बेस्ट अवलंबून आहे. मुंबई शहरातील विजेची मागणी बेस्ट उपक्रम योग्य प्रकारे नियोजन करत असली तरी बेस्ट उपक्रमासमोरील आर्थिक संकटामुळे वितरण व्यवस्थेत अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. याचा फायदा आता टाटा कंपनीने उचलून नव्याने होणाऱ्या पुनर्विकास योजनेमध्ये कमर्शियल इमारतींमधील मोठे ग्राहक आपल्याकडे वळवण्याचा निर्धार केला आहे.(Mumbai city tata power supply)

(हेही वाचा – Nitesh Rane: नितेश राणेंचा कोकणातील पाणबुडी प्रकल्पावरून हल्लाबोल, विरोधक कोणतीही माहिती न घेता भुंकत असल्याची टीका)

त्या दृष्टीकोनातून सध्या विजेचा पुरवठा करणाऱ्या अधिक क्षमतेच्या विद्युत तारा टाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या माहिम ते परळदरम्यान टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून विजेच्या केबल्स टाकल्या जात आहे. माहिमपासून वीर सावरकर मार्गापासून ते थेट सिद्धीविनायक मंदिर आणि पुढे परळपर्यंत महापालिकेच्या जी उत्तर विभागात उच्च क्षमतेच्या केबल्स टाकण्याचे काम सुरु आहे. टप्प्याटप्प्याने जी दक्षिण आणि पुढे दक्षिण मुंबईच्या दिशेने या केबल्सचे जाळे टाकण्याचे नियोजन टाटा पॉवर कंपनीने केले आहे. (Mumbai city tata power supply)

केबल्स टाकण्यासाठी रितसर परवानगी

महापालिका ‘जी’ उत्तर विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टाटा पॉवर कंपनीने केबल्स टाकण्यासाठी रितसर परवानगी घेतली असून चर खणणे आणि त्यानंतर बुजवणे यासाठीची शुल्कही त्यांनी महापालिकेला अदा केले आहे. त्यामुळे त्यांनी भरलेल्या शुल्कातून खणलेले चर निवड केलेल्या कंत्राटदारांकडून भरुन घेतले जाणार आहेत.(Mumbai city tata power supply)

(हेही वाचा – Israel Embassy Blast Case: इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे हस्तांतरित)

बेस्टने काळानुरुप बदलणे आवश्यक

बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांच्या मते टाटा पॉवर कंपनी ही मोठ्या ग्राहकांच्या शोधात आहे. त्यांना छोट्या ग्राहकांना विजेचे वितरण करता येणार नाही. बेस्ट उपक्रमाकडे ही सर्व यंत्रणा आहे. बेस्टचे वीज वितरणाचे जाळे सक्षम आहे. बेस्टचे सबस्टेशन, ट्रान्सफार्मरची यंत्रणा मजबूत असून तशी यंत्रणा सध्या तरी टाटाकडे नाही, मात्र बेस्टने काळानुरुप बदलणे आवश्यक असून सब स्टेशन तळ मजल्यावरच बनवण्याची अट बेस्टची आहे. त्यामुळे तसेच ट्रान्सफॉर्मरसाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करायला हवा. बेस्टकडे सध्या साडेदहा लाख वीज ग्राहक असून टाटा कंपनीने शहरातील ५० हजार ग्राहक आहे. परंतु नव्याने होणाऱ्या पुनर्विकासात नवीन ग्राहकांना टाटा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करते हे सत्य आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.(Mumbai city tata power supply)

भविष्यात बेस्टचे खासगीकरण होणार

तर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यामते बेस्टच्या साडेदहा लाख वीज मीटर बसवण्याचे कंत्राट अदानीला देण्यात आले आहे. आज अदानी वीज पुरवठा करत असलेल्या उपनगरांमध्ये टाटा वीजपुरवठा करत नाही, पण शहरात बेस्टचा पुरवठा होतो तिथे टाटा विजेचा पुरवठा करते तसेच टाटाचा वीज दर बेस्टच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे बेस्टचे ग्राहक भविष्यात टाटाकडे वळले तर आश्चर्य वाटू नये, असे राजा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यात बेस्टचे खासगीकरण होणार याची लक्षणे आतापासूनच दिसू लागली आहेत,असेही त्यांनी स्पष्ट केले.(Mumbai city tata power supply)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.