Mumbai-Pune Expressway :नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना दुपारी १२ नंतर मार्गस्थ करण्याचे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

204
Mumbai-Pune Expressway :नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी; पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय
Mumbai-Pune Expressway :नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी; पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटक लोणावळा खंडाळा या ठिकाणी दाखल होतात. नववर्ष आणि त्यातच वीकेंड हे दोन्ही एकत्र आल्याने या महामार्गावर वाहनांच्या मोठ्याच मोठया रांगा लागतात. काहीच दिवसांपूर्वी नाताळ सणाच्या दिवशी पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी (Traffic Issue) आवरताना पोलिसांची चांगलीच तारंबळ झाली होती. यामुळेच यावेळी देखील अवजड वाहनांना (heavy vehicles) दुपारी १२ नंतर वाहने मार्गस्थ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai-Pune Expressway)

या महार्गावरील वाहतूक कोंडीचा पोलिसांनी आढावा घेतला तेव्हा शनिवारी २४ तासांमध्ये ५५,६८६ वाहने एक्स्प्रेस वे वरील पुणे मार्गिकेवरून गेली. तसेच मुंबई पुणे जुना महामार्ग NH48 या वरून २१,१३५ वाहने गेली. या वाहनांना घाटांमधील एकत्रित मार्गाचा सुद्धा वापर करावा लागतो. इतक्या प्रचंड प्रमाणात वाहने आल्यानंतर घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. (Mumbai-Pune Expressway)

(हेही वाचा : Ram Mandir Ayodhya : रामलल्लाची मूर्ती ठरली; कोणती मूर्ती होणार गर्भगृहात विराजमान)

यामुळेच सर्व जड अवजड वाहन चालक मालक संघटना यांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, दुपारी १२ नंतर तरी सर्व जड अवजड सुरु केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे प्लेट जाणे, तसेच  इंजिनचे अनेक कामी निघू शकते. तसेच त्यामुळे इंधन व वेळेची बचत होण्यास मदत होईल असे सांगण्यात आले आहे. तसेच अनेक गाड्यांचे नुकसानही झाले होते. त्यामुळे आता प्रवाशी नागरिकांनी देखील वाहने आणताना सुरक्षितरीत्या ती वाहने चालवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.