Ram Mandir Ayodhya : रामलल्लाची मूर्ती ठरली; कोणती मूर्ती होणार गर्भगृहात विराजमान

Ram Mandir Ayodhya : शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समितीच्या सदस्यांनी तीनपैकी एक मूर्ती निवडण्यासाठी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

248
Ram Mandir Ayodhya : रामलल्लाची मूर्ती ठरली; कोणती मूर्ती होणार गर्भगृहात विराजमान
Ram Mandir Ayodhya : रामलल्लाची मूर्ती ठरली; कोणती मूर्ती होणार गर्भगृहात विराजमान

देशात मागील काही दिवसांपासून अयोध्येतील भव्य राममंदिराच्या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. रामजन्मभूमीवरील रामलल्लाची मूर्ती गर्भगृहातील मूर्ती आज निवडण्यात आली आहे. विश्वस्त सभेत मूर्ती निवडीबाबत तोंडी मतदान होऊन हा निर्णय घेण्यात आला. (Ram Mandir Ayodhya)

शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समितीच्या सदस्यांनी तीनपैकी एक मूर्ती निवडण्यासाठी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. (Rammandir Pran Pratishtha) दरम्यान या ठिकाणी पूर्वीपासून असलेल्या जुन्या मूर्तीला ‘अचल मूर्ती’ म्हटले जाईल. नवीन मूर्तीला ‘उत्सवमूर्ती’ असे संबोधले जाईल. 23 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ही मूर्ती आतील गाभाऱ्यात ठेवणार आहेत.

(हेही वाचा – Air Pollution : हवेतील प्रदुषण ‘या’ तीन विभागांमध्ये अधिक, महापालिकेच्या रडारवर ‘हे’ तीन विभाग)

मंदिरात सीतेमातेची मूर्ती नसेल

70 एकरांवर उभारल्या जाणाऱ्या राममंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. ही प्रभु श्रीरामाची 5 वर्षाचे असतांनाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती देवाच्या बालस्वरूपाची असल्याने मंदिरात माता सीतेची मूर्ती असणार नाही. (Ayodhya)

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समितीचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी याविषयी सांगितले की, “मुख्य मंदिर 360 फूट लांब आणि 235 फूट रुंद असेल. मंदिराचे शिखर 161 फूट उंच असेल. रामलल्लाच्या गर्भगृहात जाण्यासाठी 32 पायऱ्या चढाव्या लागतील.

“सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मूर्ती स्थापित केली जाईल, ती त्या स्वरूपाची असेल, ज्यामध्ये देवाचे लग्न झालेले नाही. म्हणजे मुख्य मंदिरात तुम्हाला माता सीतेची मूर्ती दिसणार नाही.”

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra : नौदल अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा)

16 जानेवारीपासून सुरु होणार विधी

16 जानेवारीपासून सात दिवस चालणाऱ्या या अभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. याअंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये श्रीराममूर्तीची मिरवणूक (Procession of Sri Ramamurthy), पारंपरिक स्नान आणि पूजा इत्यादींचा समावेश आहे.

22 जानेवारी रोजी सकाळी पूजेने सुरुवात होईल. यानंतर दुपारी शुभ मृगाशिरा नक्षत्रात श्रीराम विराजमान होतील, राममंदिर (Ram Mandir) परिसर सुमारे 70 एकरमध्ये असेल. इथे पर्यावरणासंबंधी देखील विशेष काळजी घेतली जाईल. शेकडो प्लांट, सांडपाणी व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, अग्नीशमन दलाची व्यवस्था यासोबतच संकुलाच्या आत पॉवर हाऊसही असणार आहे. (Ram Mandir Ayodhya)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.