Air Pollution : हवेतील प्रदुषण ‘या’ तीन विभागांमध्ये अधिक, महापालिकेच्या रडारवर ‘हे’ तीन विभाग

मुंबईतील हवेतील वाढत्या प्रदुषणामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आल्या असल्या तसेच यासाठी मार्गदर्शक तत्वे बनण्यात आली असली तरी प्रत्यक्षात काही भागांमध्ये धुळीचे प्रदुषण वाढलेलेच आहे.

752
Air Pollution : हवेतील प्रदुषण 'या' तीन विभागांमध्ये अधिक, महापालिकेच्या रडारवर 'हे' तीन विभाग
Air Pollution : हवेतील प्रदुषण 'या' तीन विभागांमध्ये अधिक, महापालिकेच्या रडारवर 'हे' तीन विभाग
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईतील हवेतील वाढत्या प्रदुषणामुळे (Air Pollution) प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आल्या असल्या तसेच यासाठी मार्गदर्शक तत्वे बनण्यात आली असली तरी प्रत्यक्षात काही भागांमध्ये धुळीचे प्रदुषण वाढलेलेच आहे. यामध्ये विशेषत: जुहु (Juhu), बीकेसी (BKC) आणि कुलाबा नेव्ही नगर (Colaba Navy Nagar) भागांमध्ये हे हवेतील धुलिकणांच्या वाढत्या प्रदुषणाचा (Air Pollution) त्रास कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे तीन विभाग आता महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) रडारवर असून धुलिकणांचे प्रदुषण (Dust pollution) कमी करण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळत आहे. (Air Pollution)

मुंबईत ३ डिसेंबर २०२३ पासून दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (Deep Cleaning Drive) राबविण्‍यात येत आहे. याच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन यथोचित निर्देश देण्यासाठी महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सर्व संबंधित खात्यांची गुरुवारी २८ डिसेंबर २०२३ बैठक घेतली. अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍यासह सर्व संबंधित सहआयुक्‍त, उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त, खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होते. (Air Pollution)

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra : नौदल अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा)

या बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांनी ही नाराजी व्यक्त करत शहर आणि पश्चिम उपनगरातील तीन विभागांमध्ये हवेतील वाढत्या प्रदुषणाचे (Air Pollution) प्रमाण कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालय आणि परिमंडळांच्या उपायुक्तांना दिले आहे. आयुक्तांनी या बैठकीमध्ये एच पूर्व विभागातील बीकेसीचा परिसर, के पश्चिम विभाग विभागातील जुहूचा (Juhu) परिसर आणि ए विभागातील कुलाबा नेव्ही नगरचा (Colaba Navy Nagar) परिसरात हवेतील प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केली. (Air Pollution)

कुठलीही भिडभाड न बाळगता थेट कारवाई

या भागांमध्ये बांधकामांमुळे हे हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढत असावे अशी शक्यता असून या ठिकाणी बांधकामांमध्ये महापालिकेने बनवलेल्या मार्गदर्शक धोरणांची अंमलजबावणी केली जात नाही. त्यामुळे या संबंधित विभागांच्या सहायक आयुक्तांना निर्देश देत या भागांमधील ज्या बांधकामांमध्ये मार्गदर्शक धोरणांचे पालन होत नाही, तिथे कुठलीही भिडभाड न बाळगता थेट कारवाई करण्यात यावी. प्रसंगी पोलिस तक्रारही करावी अशाप्रकारचे निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती दिली आहे. या भागांमध्ये अधिकाधिक धुळ शमन यंत्राचा (Dust suppression device) वापर करावा तसेच रस्ते पाण्याने धुण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय अनधिकृत बॅनर व होर्डींग प्रकरणीही कडक कारवाई करण्याचेही या भागातील सहायक आयुक्तांना निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.